News Flash

IPL 2019 DC vs KXIP : धवन, श्रेयसची अर्धशतके; दिल्लीचा पंजाबवर दमदार विजय

शिखर धवन ५६, कर्णधार श्रेयस अय्यर ५८*

IPL 2019 DC vs KXIP Updates : शिखर धवन (५६) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (५८*) यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने पंजाबच्या संघाला ५ गडी राखून पराभूत केले. सलामीवीर ख्रिस गेलने केलेल्या आक्रमक अर्धशतकी (६९) खेळाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने १६३ धावांपर्यंत मजल मारली होती आणि दिल्लीला १६४ धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना सामना अटीतटीचा झाला, पण अखेर २ चेंडू शिल्लक ठेवून दिल्लीने पंजाबला धूळ चारली.

१६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ धावबाद झाला. ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने १३ धावा केल्या. शॉ बाद झाल्यावर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनी दिल्लीचा डाव सावरला आणि भक्कम भागीदारी केली. दिल्लीच्या संघातून खेळताना शिखर धवनने आपला अनुभव दाखवून देत हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याबरोबरच दिल्लीनेही शतकी मजल मारली. अर्धशतकी खेळी केल्यानंतर शिखर धवन हवेत उंच फटका मारून झेलबाद झाला. त्याने ४१ चेंडूत ५६ धावा केल्या. त्यात ७ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. ऋषभ पंतने अतिशय खराब फटका खेळत तंबूचा रस्ता धरला. त्याने केवळ ७ धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने अत्यंत महत्वपूर्ण खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एक बाजू लावून धरली. फटकेबाजी करणारा कॉलिन इन्ग्राम मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला आणि सामन्यात रंगत वाढली. त्याने ४ चौकारांसह ९ चेंडूत १९ धावा केल्या. निर्णायक क्षणी दुहेरी धाव घेण्याचा अक्षर पटेल याचा प्रयत्न फसला. मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांच्यात टक्कर होता होता राहिली, पण त्यामुळे पटेल नाट्यमय पद्धतीने धावबाद झाला आणि नाराज होऊन तंबूत परतला. अखेर श्रेयस अय्यरने चौकार लगावत दिल्लीला सामना जिंकवून दिला. अय्यरने नाबाद ५८ धावा केल्या.

पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळालेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, डेव्हिड मिलर हे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर ख्रिस गेलने मनदीप सिंहच्या साथीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यादरम्यान ख्रिस गेलने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. सलामीवीर ख्रिस गेलने केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने १६३ धावांपर्यंत मजल मारता आली. ख्रिस गेलने ३७ चेंडूत ६९ धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. ही जोडी फुटल्यानंतर पंजाबचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. यानंतर हरप्रीत ब्रार आणि रविचंद्रन आश्विन यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. पंजाबकडून संदीप लामिच्छानेने ३, अक्षर पटेल आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी २-२ बळी घेतले.

लोकसत्ता समालोचन
Live Blog
Highlights
 • 00:07 (IST)

  धवन, श्रेयसची अर्धशतके; दिल्लीचा पंजाबवर दमदार विजय

  शिखर धवन (५६) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (५८*) यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने पंजाबच्या संघाला ५ गडी राखून पराभूत केले. 

 • 23:40 (IST)

  कर्णधार श्रेयस अय्यरचे महत्वपूर्ण अर्धशतक

  दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने अत्यंत महत्वपूर्ण खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एक बाजू लावून धरली.

 • 23:02 (IST)

  धवनचे दमदार अर्धशतक; दिल्लीची शतकी मजल

  दिल्लीच्या संघातून खेळताना शिखर धवनने आपला अनुभव दाखवून देत हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याबरोबरच दिल्लीनेही शतकी मजल मारली.

 • 21:08 (IST)

  ख्रिस गेल माघारी, पंजाबला चौथा धक्का

  संदीप लामिच्छानेच्या गोलंदाजीवर गेल माघारी, गेलची ६९ धावांची खेळी

 • 20:45 (IST)

  ख्रिस गेलचं अर्धशतक, पंजाबची झुंज सुरुच

  गेलने एका बाजूने बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं

 • 20:11 (IST)

  पंजाबला पहिला धक्का, लोकेश राहुल माघारी

  संदीप लामिच्छानेच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने केलं राहुलला यष्टीचीत

00:07 (IST)21 Apr 2019
धवन, श्रेयसची अर्धशतके; दिल्लीचा पंजाबवर दमदार विजय

शिखर धवन (५६) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (५८*) यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने पंजाबच्या संघाला ५ गडी राखून पराभूत केले. 

23:49 (IST)20 Apr 2019
अक्षर पटेल नाट्यमय पद्धतीने धावबाद

निर्णायक क्षणी दुहेरी धाव घेण्याचा अक्षर पटेल याचा प्रयत्न फसला. मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांच्यात टक्कर होता होता राहिली, पण त्यामुळे पटेल नाट्यमय पद्धतीने धावबाद झाला आणि नाराज होऊन तंबूत परतला.

23:43 (IST)20 Apr 2019
इन्ग्राम त्रिफळाचित; सामन्यात रंगत

फटकेबाजी करणारा कॉलिन इन्ग्राम मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला आणि सामन्यात रंगत वाढली. त्याने ४ चौकारांसह ९ चेंडूत १९ धावा केल्या.

23:40 (IST)20 Apr 2019
कर्णधार श्रेयस अय्यरचे महत्वपूर्ण अर्धशतक

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने अत्यंत महत्वपूर्ण खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एक बाजू लावून धरली.

23:25 (IST)20 Apr 2019
ऋषभ पंत झलेबाद; दिल्लीला तिसरा धक्का

ऋषभ पंतने अतिशय खराब फटका खेळत तंबूचा रस्ता धरला. त्याने केवळ ७ धावा केल्या.

23:11 (IST)20 Apr 2019
अर्धशतकवीर धवन बाद; दिल्लीला दुसरा धक्का

अर्धशतकी खेळी केल्यानंतर शिखर धवन हवेत उंच फटका मारून झेलबाद झाला. त्याने ४१ चेंडूत ५६ धावा केल्या. त्यात ७ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता.

23:02 (IST)20 Apr 2019
धवनचे दमदार अर्धशतक; दिल्लीची शतकी मजल

दिल्लीच्या संघातून खेळताना शिखर धवनने आपला अनुभव दाखवून देत हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याबरोबरच दिल्लीनेही शतकी मजल मारली.

22:52 (IST)20 Apr 2019
धवन-अय्यर जोडीने दिल्लीचा डाव सावरला

शॉ बाद झाल्यावर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनी दिल्लीचा डाव सावरला आणि भक्कम भागीदारी केली.

22:21 (IST)20 Apr 2019
पृथ्वी शॉ धावचीत; दिल्लीला पहिला धक्का

१६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ धावबाद झाला. ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने १३ धावा केल्या.

21:49 (IST)20 Apr 2019
पंजाबची १६३ धावांपर्यंत मजल

दिल्ली विजयासाठी १६४ धावांचं आव्हान

21:42 (IST)20 Apr 2019
रविचंद्रन आश्विन माघारी, दिल्लीला सातवा धक्का

कगिसो रबाडाने घेतला बळी

21:24 (IST)20 Apr 2019
पंजाबला सहावा धक्का, मनदीप माघारी

अक्षर पटेलने घेतला बळी

21:09 (IST)20 Apr 2019
लागोपाठ सॅम करन माघारी, पंजाबचा निम्मा संघ तंबूत परतला

दिल्लीचं सामन्यात दमदार पुनरागमन

21:08 (IST)20 Apr 2019
ख्रिस गेल माघारी, पंजाबला चौथा धक्का

संदीप लामिच्छानेच्या गोलंदाजीवर गेल माघारी, गेलची ६९ धावांची खेळी

20:45 (IST)20 Apr 2019
ख्रिस गेलचं अर्धशतक, पंजाबची झुंज सुरुच

गेलने एका बाजूने बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं

20:43 (IST)20 Apr 2019
पंजाबला तिसरा धक्का, डेव्हिड मिलर माघारी

अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना मिलर झेलबाद

20:27 (IST)20 Apr 2019
पंजाबला दुसरा धक्का

मयांक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला

20:11 (IST)20 Apr 2019
पंजाबला पहिला धक्का, लोकेश राहुल माघारी

संदीप लामिच्छानेच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने केलं राहुलला यष्टीचीत

19:59 (IST)20 Apr 2019
दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय महत्वाचा

टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : डी-कॉक – सूर्यकुमारची जोडी चमकली, धोनी-रायुडूचा विक्रम मोडीत
2 नेतृत्वबदल राजस्थानच्या पथ्यावर, मुंबई इंडियन्सवर ५ गडी राखून मात
3 IPL 2019 : अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरुन हटवलं, स्टिव्ह स्मिथकडे राजस्थानचं नेतृत्व
Just Now!
X