News Flash

IPL 2019 : दिल्लीच्या विजयात ‘गब्बर’ ठरला चौकारांचा बादशहा

गौतम गंभीरचा सर्वाधिक चौकारांचा विक्रम मोडला

कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला पराभवाचा धक्का दिला. पंजाबने दिलेलं १६४ धावांचं आव्हान दिल्लीच्या फलंदाजांनी ५ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. शिखर धवनने ५६ तर कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद ५८ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान शिखर धवनने आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर पहिल्या स्थानी पोहचला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात शिखरने ७ चौकार लगावले. आयपीएलमध्ये शिखरच्या नावावर ५०० चौकार जमा आहेत. त्याने गौतम गंभीरचा ४९२ चौकारांचा विक्रम मोडीत काढला.

दरम्यान, १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ धावबाद झाला. ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने १३ धावा केल्या. शॉ बाद झाल्यावर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनी दिल्लीचा डाव सावरला आणि भक्कम भागीदारी केली. अर्धशतकी खेळी केल्यानंतर शिखर धवन हवेत उंच फटका मारून झेलबाद झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 2:02 pm

Web Title: ipl 2019 dc vs kxip shikhar dhawan becomes first batsman to score 500 fours in ipl
टॅग : IPL 2019
Next Stories
1 विश्वचषकाआधी धोनीने ‘हे’ करावं – श्रीकांत
2 IPL 2019 : बाबांचा खेळ पाहण्यासाठी आई रितिकासोबत समायरा स्टेडियमध्ये
3 IPL 2019 : डीव्हिलियर्सने केलं विराटचं बारसं; दिलं ‘हे’ झकास टोपणनाव
Just Now!
X