IPL 2019 DC vs SRH Updates : बेअरस्टोची तडाखेबाज खेळी (४८) आणि मोहम्मद नबीची अखेरच्या क्षणातील फटकेबाजी यांच्या जोरावर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने ५ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने २० षटकात ८ बाद १२९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव मध्ये थोडा अडखळला, पण अखेर त्यांनी सामना जिंकून विजयी लय कायम राखली.

१३० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने तडाखेबाज सुरुवात केली आणि केवळ ३२ चेंडूत अर्धशतकी सलामी दिली. बेअरस्टोने धमाकेदार सुरुवात केली. पण तडाखेबाज खेळी करणाऱ्या बेअरस्टोला अर्धशतकाने हुलकावणी दिली आणि अखेर हैदराबादला पहिला धक्का बसला. त्याने २८ चेंडूत ४८ धावा केल्या. त्यात ९ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. फटकेबाजीच्या प्रयत्नात डेव्हिड वॉर्नर झेलबाद झाला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. त्याने १८ चेंडूत १० धावा केल्या. बेअरस्टो-वॉर्नर बाद झाल्यावर मनीष पांडे आणि विजय शंकर दोघांनी डाव सावरला. पण उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने १३ चेंडूत १० धावा केल्या. मनीष पांडे बाद झाल्यावर पाठोपाठ विजय शंकरदेखील झेलबाद झाला आणि हैदराबादला चौथा धक्का बसला. विजयने २१ चेंडूत १६ धावा केल्या. दीपक हुडाने फिरकीपटूला षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण तो झेलबाद झाला. त्याने ११ चेंडूत १० धावा केल्या. अखेर मोहम्मद नबी आणि युसूफ पठाण यांनी हैदराबादला विजय मिळवून दिला.

त्याआधी दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ त्रिफळाचीत झाला. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला माघारी धाडले. शॉ ने ११ चेंडूत २ चौकार लगावत ११ धावा केल्या. भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन दिल्लीकडून आज खेळताना फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर तो स्वीप करण्याच्या प्रयत्नात झेल बाद झाला. त्याने १४ चेंडूत एका चौकारासह १२ धावा केल्या. दिल्लीकरांना चांगल्या कामगिरी अपेक्षा असलेला ऋषभ पंत अवघ्या ५ धावा करून माघारी परतला आणि दिल्लीला तिसरा धक्का बसला. केवळ ७ चेंडू खेळलेला पंत मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. संघात पुनरागमन झालेला राहुल तेवतीया आपली छाप पाडू शकला नाही. तो देखील ७ चेंडूत ५ धावा करून झेलबाद झाला. संदीप शर्माने त्याला परतीचा मार्ग दाखवला. डावखुरा परदेशी फलंदाज कॉलिन इन्ग्रॅम ८ धावांवर माघारी परतला आणि दिल्लीला पाचवा धक्का बसला. सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर चौकार लागवण्याच्या प्रयत्नात असताना मनीष पांडेने त्याचा अप्रतिम झेल टिपला. झटपट गडी बाद होत असताना कर्णधार श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरली. पण शेवटची ४ षटके शिल्लक असताना फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात त्याची झुंज संपुष्टात आली. अय्यरने ४१ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ४३ धावा केल्या. १ चौकार आणि १ षटकार लगावणारा ख्रिस मॉरिस लवकर झेलबाद झाला. त्याने १५ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर चौकार लगावून रबाडा झेलबाद झाला. अखेर अक्षर पटेलने केलेल्या फटकेबाजीच्या (२३*) जोरावर दिल्लीने २० षटकात ८ बाद १२९ धावा केल्या.

Live Blog

23:05 (IST)04 Apr 2019
दीपक हुडा झेलबाद; हैदराबादला पाचवा धक्का

दीपक हुडाने फिरकीपटूला षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण तो झेलबाद झाला. त्याने ११ चेंडूत १० धावा केल्या.

22:59 (IST)04 Apr 2019
विजय शंकर झेलबाद; हैदराबादला चौथा धक्का

बेअरस्टो-वॉर्नर बाद झाल्यावर मनीष पांडे बाद झाल्यावर पाठोपाठ विजय शंकरदेखील झेलबाद झाला आणि हैदराबादला चौथा धक्का बसला. विजयने २१ चेंडूत १६ धावा केल्या.

22:54 (IST)04 Apr 2019
मनीष पांडे झेलबाद; हैदराबादला तिसरा धक्का

बेअरस्टो-वॉर्नर बाद झाल्यावर मनीष पांडे आणि विजय शंकर दोघांनी डाव सावरला. पण उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने १३ चेंडूत १० धावा केल्या.

22:29 (IST)04 Apr 2019
वॉर्नर झेलबाद; हैदराबादला दुसरा धक्का

फटकेबाजीच्या प्रयत्नात डेव्हिड वॉर्नर झेलबाद झाला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. त्याने १८ चेंडूत १० धावा केल्या.

22:22 (IST)04 Apr 2019
बेअरस्टोला अर्धशतकाची हुलकावणी; हैदराबादला पहिला धक्का

तडाखेबाज खेळी करणाऱ्या बेअरस्टोला अर्धशतकाने हुलकावणी दिली आणि अखेर हैदराबादला पहिला धक्का बसला. त्याने २८ चेंडूत ४८ धावा केल्या. त्यात ९ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता.

22:17 (IST)04 Apr 2019
दिल्लीची तडाखेबाज सुरुवात; सहाव्या षटकात अर्धशतक

१३० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने तडाखेबाज सुरुवात केली आणि केवळ ३२ चेंडूत अर्धशतकी सलामी दिली. बेअरस्टोने धमाकेदार सुरुवात केली.

21:38 (IST)04 Apr 2019
श्रेयस अय्यरची एकाकी झुंज; हैदराबादपुढे १३० धावांचे आव्हान

कर्णधार श्रेयस अय्यरची ४३ धावांची झुंजार खेळी आणि अक्षर पटेलने केलेली फटकेबाजी (२३*) याच्या जोरावर दिल्लीने २० षटकात ८ बाद १२९ धावा केल्या. 

21:35 (IST)04 Apr 2019
रबाडा झेलबाद; दिल्लीला सातवा धक्का

चौकार लगावून रबाडा झेलबाद झाला. 

21:32 (IST)04 Apr 2019
ख्रिस मॉरिस झेलबाद; दिल्लीला सातवा धक्का

१ चौकार आणि १ षटकार लगावणारा ख्रिस मॉरिस लवकर झेलबाद झाला. त्याने १५ चेंडूत १७ धावा केल्या.

21:21 (IST)04 Apr 2019
कर्णधार अय्यरची झुंज संपुष्टात; दिल्लीचा सहावा गडी माघारी

झटपट गडी बाद होत असताना कर्णधार श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरली. पण शेवटची ४ षटके शिल्लक असताना फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात त्याची झुंज संपुष्टात आली. अय्यरने ४१ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ४३ धावा केल्या.

21:06 (IST)04 Apr 2019
कॉलिन इन्ग्रॅम माघारी, दिल्लीला पाचवा धक्का

डावखुरा परदेशी फलंदाज कॉलिन इन्ग्रॅम ८ धावांवर माघारी परतला आणि दिल्लीला पाचवा धक्का बसला. सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर चौकार लागवण्याच्या प्रयत्नात असताना मनीष पांडेने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

20:53 (IST)04 Apr 2019
राहुल तेवतीया झेलबाद; दिल्लीला चौथा धक्का

संघात पुनरागमन झालेला राहुल तेवतीया आपली छाप पाडू शकला नाही. तो देखील ७ चेंडूत ५ धावा करून झेलबाद झाला. संदीप शर्माने त्याला परतीचा मार्ग दाखवला.

20:44 (IST)04 Apr 2019
पंत ५ धावांवर माघारी; दिल्लीला तिसरा धक्का

दिल्लीकरांना चांगल्या कामगिरी अपेक्षा असलेला ऋषभ पंत अवघ्या ५ धावा करून माघारी परतला आणि दिल्लीला तिसरा धक्का बसला. केवळ ७ चेंडू खेळलेला पंत मोठा फटका खेळताना झेलबाद झाला.

20:25 (IST)04 Apr 2019
अनुभवी धवन झेलबाद; दिल्लीला दुसरा धक्का

भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन दिल्लीकडून आज खेळताना फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर तो स्वीप करण्याच्या प्रयत्नात झेल बाद झाला. त्याने १४ चेंडूत एका चौकारासह १२ धावा केल्या.

20:11 (IST)04 Apr 2019
पृथ्वी शॉ त्रिफळाचीत; दिल्लीला पहिला धक्का

दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ त्रिफळाचीत झाला. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला माघारी धाडले. शॉ ने ११ चेंडूत २ चौकार लगावत ११ धावा केल्या.

19:35 (IST)04 Apr 2019
नाणेफेक जिंकून हैदराबादची प्रथम गोलंदाजी

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

संघातील बदल - हैदराबादच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण दिल्लीच्या संघात मात्र ३ बदल करण्यात आहेत. इशांत शर्मा, राहुल तेवतीया आणि अक्षर पटेल या तिघांचे संघात पुनरागमन झाले आहे.