News Flash

IPL 2019 : दिल्ली कॅपिटल्स संघाला मिळणार ‘दादा’माणसाचं मार्गदर्शन

रिकी पाँटींगसोबत करणार काम

आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठी नाव बदलून नव्याने मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला, टीम इंडियाचा माजी कर्णधार मार्गदर्शन करणार आहे. दिल्लीच्या संघव्यवस्थापनाने माजी कर्णधार सौरव गांगुलीची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मार्गदर्शक पदासाठी नेमणूक केली आहे. आगामी हंगामासाठी सौरव गांगुली प्रशिक्षक रिकी पाँटींगसोबत काम करणार आहे.

“दिल्ली कॅपिटल्स संघासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. सर्व खेळाडू आणि सहाकारी कर्मचाऱ्यांसोबत काम करायला मला जरुर आवडेल”, अशी प्रतिक्रीया सौरव गांगुलीने दिली आहे. सौरव हा भारतीय क्रिकेटचा एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनुभवाचा फायदा आमच्या संघाला नक्की होईल, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे सौरव आमच्या संघासोबत काम करणार ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. दिल्ली कॅपिटल्सचे चेअरमन पार्थ जिंदाल यांनी सौरवच्या आगमनाबद्दल प्रतिक्रीया व्यक्त केली. 23 मार्चपासून आयपीएलच्या आगामी हंगामाला सुरुवात होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 3:22 pm

Web Title: ipl 2019 delhi capitals appoint sourav ganguly as advisor
टॅग : IPL 2019,Saurav Ganguly
Next Stories
1 मालिका पराभवानंतर विराटचा सहकाऱ्यांना सल्ला, आयपीएलची मजा घ्या !
2 Video : ओळखा कुणाकडून शिकलो मी हा फटका? हार्दिकचं चॅलेन्ज
3 ऑलिम्पिक पात्रतेचे दीपाचे ध्येय!
Just Now!
X