आयपीएलच्या बाराव्या हंगामाच चेन्नई सुपरकिंग्जचा विजयरथ मुंबई इंडियन्सने वानखेडे मैदानावर अडवला. 37 धावांनी चेन्नईवर मात करत मुंबईने हंगामातल्या आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. चेन्नईकडून ब्राव्होने या सामन्यात चेन्नईने शंभरावा बळीही घेतला. मात्र ब्राव्होच्या अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडीने 29 धावा कुटत सामना मुंबईच्या दिशेने फिरवला होता.

या सामन्यानंतर पंजाबसमोर किंग्ज इलेव्हन पंजाबचं आव्हान असणार आहे. मात्र या सामन्यात ड्वेन ब्राव्होच्या समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ब्राव्होला मुंबईविरुद्ध सामन्यात दुखापत झाली असून याची माहिती कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सामना संपल्यानंतर दिली होती. त्यामुळे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ब्राव्हो पंजाबविरुद्ध खेळू शकेल की नाही याबाबतचं चित्र स्पष्ट होईल. चेन्नई सुपरकिंग्जच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

दरम्यान मुंबईविरुद्धच्या सामन्यात, चेन्नईकडून मराठमोळ्या केदार जाधवचा अपवाद वगळता एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजाचा सामना करु शकला नाही. अखेरच्या षटकात चेन्नईच्या फलंदाजांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी त्यांचे प्रयत्न सफल होऊ दिले नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हा शंभरावा विजय ठरला. आतापर्यंत एकाही संघाला अशी कामगिरी करणं जमलेलं नाहीये.

अवश्य वाचा – IPL 2019 : हैदराबादसाठी मोहम्मद नबी ठरतोय शंभर नंबरी सोनं

२०१३ साली, मुंबईने चेन्नईवर ६० धावांनी मात करत सलग ७ सामन्यांच्या विजयाची शृखंला खंडीत केली होती. चेन्नईचा आयपीएलमधला हा सर्वात मोठा पराभव होता. यानंतर २०१८-१९ मध्येही मुंबईनेच पुन्हा एकदा चेन्नईची ६ सामन्यांची विजयी मालिका थांबवली आहे. मुंबईकडून हार्दिक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अष्टपैलू कामगिरी केली.

अवश्य वाचा – टी-20 क्रिकेटमध्ये चंद्रपॉलचा भीमपराक्रम; गोलंदाजांचा समाचार घेत द्विशतकी खेळी