News Flash

Video : हार्दिक पांड्याचा सणसणीत हेलिकॉप्टर शॉट, धोनीही झाला अवाक

हार्दिकची पोलार्डसोबत महत्वाची भागीदारी

आयपीएलच्या बाराव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्यांदा गोलंदाजी करताना, मुंबईला १४९ धावांमध्ये रोखण्यात यश मिळवलं. रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी फटकेबाजी करत मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. मधल्या फळीत हार्दिक पांड्याने पोलार्डच्या साथीने संघाचा डाव सावरला. यावेळी शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने सणसणीत षटकार खेचत सर्वांचं मन जिंकलं.

दुर्दैवाने हार्दिक पांड्या मोठी खेळी साकारू शकला नाही. मात्र ठाकूरच्या गोलंदाजीवर खेचलेला हेलिकॉप्टर शॉट पाहून धोनीही चांगलाच अवाक झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने पोलार्डच्या फटकेबाजीच्या जोरावर १४९ धावांपर्यंत मजल मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 10:28 pm

Web Title: ipl 2019 final hardik pandya played helicopter shot in front of ms dhoni
Next Stories
1 Video : ‘सुपर’ स्टंपिंग! डी कॉकची चपळता पाहून मुंबईकर खुश
2 IPL 2019 : अंतिम सामन्यातही निकृष्ट अंपायरिंग, पोलार्डचा मैदानातच निषेध
3 IPL 2019 Final : कार्तिकला मागे टाकत महेंद्रसिंह धोनी सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक
Just Now!
X