IPL 2019 Final MI vs CSK Live Updates : शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला १ धावेने पराभूत केले आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.

१५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. पण त्यातच तो यष्टिचीत झाला. षटकात २ चौकार आणि १ षटकार लगावल्यानंतरही त्याने आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहीही कळण्याआधीच क्विंटन डी कॉक ने त्याला यष्टीचीत करत चेन्नईला पहिला धक्का दिला. डु प्लेसिसने २६ धावा केल्या. संथ खेळी करत खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करताना रैना झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूत ८ धावा केल्या. आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना रायडू स्वस्तात झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर खराब क्षेत्ररक्षणामुळे कर्णधार धोनीने दुसरी धाव घेण्याचा विचार केला, पण ईशान किशनने उत्तम थ्रो करत त्याला धावचीत केले. धोनीने ८ चेंडूत २ धावा केल्या.

Today Mumbai Indians vs Delhi Capitals match in Indian Premier League IPL MI VS DC 2024 sport news
Ipl match, DC vs MI: मुंबईला विजयी लय सापडणार? आज घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; हार्दिक, सूर्यकुमारकडे लक्ष
ipl 2024 rajasthan royals vs delhi capitals
IPL 2024 : पंतच्या नेतृत्वाचा कस! दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान; फलंदाजांकडून अपेक्षा
Shubman Gill fined 12 lakhs
IPL 2024 : गुजरात टायटन्सला पराभवानंतर आणखी एक धक्का, कर्णधार शुबमन गिलला ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड
IPL 2024 Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: यंदाही मुंबई इंडियन्सची पहिली मॅच देवालाच, शुबमनच्या गुजरातने हार्दिकच्या मुंबईला पाजलं पाणी

एका बाजूने गडी बाद असताना शेन वॉटसनचे मात्र संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी केली पण दुहेरी धाव घेताना तो ८० धावांवर धावचीत झाला. नंतर सामना अत्यंत अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना मलिंगाने फलंदाजाला पायचीत करत मुंबईला विजय मिळवून दिला.

त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. अत्यंत संयमी सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने दुसऱ्या षटकात अखेर उत्तुंग असा पहिला षटकार लगावला. महत्वाचे म्हणजे हा षटकार लगावल्यानंतर चेंडू गायब झाला. त्यामुळे सामन्यात नवा चेंडू घेण्यात आला. रोहितने पहिला षटकार लगावल्यानंतर पुढच्याच षटकात क्विंटन डी कॉकने दीपक चहरचा समाचार घेतला. त्याने त्याच्या एकाच षटकात तब्बल ३ षटकार लगावले. ४ षटकार फटकावल्यानंतर एक आखूड टप्प्याचा चेंडू टोलवताना सलामीवीर डी कॉक झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. त्याने १७ चेंडूत २९ धावा केल्या. डी कॉक पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माही झेलबाद झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. रोहितने १ चौकार आणि १ षटकार खेचत चांगली सुरुवात केली होती, पण मोठा फटका खेळताना त्याचा अंदाज चुकला आणि तो बाद झाला. त्याने १५ धावा केल्या.

प्ले ऑफ्स च्या पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध मुंबईला विजय मिळवून देणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात स्वस्तात त्रिफळाचीत झाला. त्याने १५ धावा केल्या. फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या कृणाल पांड्याला लवकर माघारी परतावे लागले. त्याने केवळ ७ धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने २६ चेंडूत २३ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश होता. मोठे फटके खेळणारा हार्दिक पांड्या पायचीत झाला. पांड्याने DRS ची मदत घेतली, पण तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बादच ठरवले. हार्दिकने १६ धावा केल्या. अखेर BIrthday Boy कायरन पोलार्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत मुंबईला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. पोलार्डने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.

Live Blog

23:58 (IST)12 May 2019
मलिंगा ठरला हिरो; शेवटच्या चेंडूवर मुंबईचा IPL विजेतेपदाचा चौकार

शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला १ धावेने पराभूत केले आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.

23:00 (IST)12 May 2019
शेन वॉटसनचे झुंजार अर्धशतक

एका बाजूने गडी बाद असताना शेन वॉटसनचे मात्र संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले.

22:43 (IST)12 May 2019
कर्णधार धोनी धावचीत; मुंबईचे सामन्यात 'कमबॅक'

पहिली धाव पूर्ण केल्यानंतर खराब क्षेत्ररक्षणामुळे कर्णधार धोनीने दुसरी धाव घेण्याचा विचार केला, पण ईशान किशनने उत्तम थ्रो करत त्याला धावचीत केले. धोनीने ८ चेंडूत २ धावा केल्या.

22:28 (IST)12 May 2019
रायडू झेलबाद; चेन्नईला तिसरा धक्का

आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना रायडू स्वस्तात झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली.

22:22 (IST)12 May 2019
सुरेश रैना पायचीत; चेन्नईला दुसरा धक्का

संथ खेळी करत खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करताना रैना झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूत ८ धावा केल्या.

21:49 (IST)12 May 2019
डु प्लेसिस माघारी; चेन्नईला पहिला धक्का

१५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. पण त्यातच तो यष्टिचीत झाला. षटकात २ चौकार आणि १ षटकार लगावल्यानंतरही त्याने आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहीही कळण्याआधीच क्विंटन डी कॉक ने त्याला यष्टीचीत करत चेन्नईला पहिला धक्का दिला. डु प्लेसिसने २६ धावा केल्या.

21:18 (IST)12 May 2019
अंतिम टप्प्यात पोलार्डची फटकेबाजी; चेन्नईला १५० धावांचे लक्ष्य

अंतिम टप्प्यात पोलार्डची फटकेबाजी; चेन्नईला १५० धावांचे लक्ष्य

21:03 (IST)12 May 2019
हार्दिक पांड्या पायचीत; मुंबईला सहावा धक्का

मोठे फटके खेळणारा हार्दिक पांड्या पायचीत झाला. पांड्याने DRS ची मदत घेतली, पण तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बादच ठरवले. हार्दिकने १६ धावा केल्या.

20:42 (IST)12 May 2019
ईशान किशन झेलबाद; मुंबईचा निम्मा संघ माघारी

खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने २६ चेंडूत २३ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश होता.

20:42 (IST)12 May 2019
Birthday Boy पोलार्डला सचिनकडून खास संदेश
20:31 (IST)12 May 2019
कृणाल पांड्या माघारी; मुंबईला चौथा धक्का

फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या कृणाल पांड्याला लवकर माघारी परतावे लागले. त्याने केवळ ७ धावा केल्या.

20:26 (IST)12 May 2019
सूर्यकुमार यादव त्रिफळाचीत; मुंबईला तिसरा धक्का

प्ले ऑफ्स च्या पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध मुंबईला विजय मिळवून देणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात स्वस्तात त्रिफळाचीत झाला. त्याने १५ धावा केल्या.

19:58 (IST)12 May 2019
डी कॉक पाठोपाठ रोहित झेलबाद; मुंबईला दुसरा धक्का

डी कॉक पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माही झेलबाद झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. रोहितने १ चौकार आणि १ षटकार खेचत चांगली सुरुवात केली होती, पण मोठा फटका खेळताना त्याचा अंदाज चुकला आणि तो बाद झाला. त्याने १५ धावा केल्या.

19:54 (IST)12 May 2019
सलामीवीर डी कॉक झेलबाद; मुंबईला पहिला धक्का

४ षटकार फटकावल्यानंतर एक आखूड टप्प्याचा चेंडू टोलवताना सलामीवीर डी कॉक झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. त्याने १७ चेंडूत २९ धावा केल्या.

19:50 (IST)12 May 2019
डी कॉकने घेतला दीपक चहरचा समाचार; षटकात लगावले ३ षटकार

रोहितने पहिला षटकार लगावल्यानंतर पुढच्याच षटकात क्विंटन डी कॉकने दीपक चहरचा समाचार घेतला. त्याने त्याच्या एकाच षटकात तब्बल ३ षटकार लगावले.

19:42 (IST)12 May 2019
रोहित शर्माचा पहिला षटकार आणि चेंडू गायब

अत्यंत संयमी सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने दुसऱ्या षटकात अखेर उत्तुंग असा पहिला षटकार लगावला. महत्वाचे म्हणजे हा षटकार लगावल्यानंतर चेंडू गायब झाला. त्यामुळे सामन्यात नवा चेंडू घेण्यात आला.

19:38 (IST)12 May 2019
रोहितची चिमुकलीही तयार.. पहा खास फोटो

मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅन्डल वरून बेबी समायरा अंतिम सामन्यासाठी तयार असल्याचे ट्विट करण्यात आले आहे. तसेच तिचा एक गोंडस फोटोदेखील ट्विट करण्यात आला आहे.

गोंडस फोटो पाहण्यासाठी - पहा खास फोटो

19:28 (IST)12 May 2019
...म्हणून अंतिम सामन्यात नाणेफेक महत्वाची

आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामना जिंकण्यासाठी नाणेफेक हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत ११ अंतिम सामन्यांपैकी ८ वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. 

या बाबत अधिक वाचण्यासाठी - ...म्हणून अंतिम सामन्यात नाणेफेक महत्वाची

19:03 (IST)12 May 2019
नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम फलंदाजी

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईकडून फिरकीपटू जयंत यादवला वगळण्यात आले असून त्या जागी वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनघन याला संधी देण्यात आली आहे. चेन्नईच्या संघात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.