IPLच्या २०१९मध्ये होणाऱ्या हंगामासाठी भारताचा सलामीवीर शिखर धवन हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळणार आहे. ५ नोव्हेंबरला याबाबतची अधिकृत घोषणा दिल्लीच्या संघाकडून करण्यात आली. आधी हैदराबाद संघाकडून खेळणारा शिखर धवन आता दिल्ली संघाकडून खेळणार आहे. याबाबत बोलताना ”ही तर माझ्यासाठी घरवापरसीच आहे”, अशा भावना शिखर धवन याने व्यक्त केल्या आहेत.

दिल्लीच्या संघाकडून परत एकदा खेळताना कसे वाटेल असा अपेक्षित प्रश्न विचारल्यानंतर शिखर म्हणाला की हि माझी घरवापसीच आहे. मी दिल्लीतच लहानाचा मोठा झालो. क्रिकेटदेखील मी तेथेच खेळायला शिकलो. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीकडून खेळायला मिळणार याचा आनंद आहे. क्रिकेट आणि IPL दोन्हीच्या दृष्टीने एक फायदा म्हणजे IPL २०१९ मधील निम्मे सामने मी दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानावर खेळेन. या मैदानावर मी या आधीही भरपूर किर्केट सामने खेळलो आहे. मला तेथील खेळपट्टीचा अंदाज आहे आणि त्याचा मला व संघाला फायदाच होईल.

”दिल्लीच्या संघाकडून खेळताना मला वीरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅकग्रा, एबी डीव्हिलियर्स, गौतम गंभीर, डॅनियल व्हेटोरी या दिग्गज खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रम शेअर करता आली. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. त्यानंतर मुंबईच्या संघात मला सचिन तेंडुलकर याच्याबरोबर सलामीला फलंदाजी करता आली. डेक्कन चार्जर्स संघात मला कुमार संगाकाराकडून चांगल्या टिप्स मिळाल्या. या सर्व गोष्टींमुळे माझा आत्मविश्वास दुणावला. या साऱ्याचा दिल्ली कॅपिटल्स संघासाठी मी नक्कीच वापर करेन”, असेही धवन म्हणाला.

दरम्यान, शिखर धवनच्या बदल्यात दिल्लाच्या संघाला मोठी किंमत मोजोवी लागली. हैदराबादच्या संघाने शहाबाज नदीम, अभिषेक शर्मा आणि विजय शंकर या तीन खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवनला दिल्लीच्या संघाकडे हस्तांतरित केले.