03 April 2020

News Flash

‘IPL 2019’मध्ये जम्मू-काश्मीरचाही संघ खेळणार’

जम्मू काश्मीरचा संघ त्या सामन्यांचे यजमानपद भूषवेल, अशी आशाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

संग्रहीत छायाचित्र

सीमेवरील हल्ले आणि अंतर्गत राजकीय हालचाली यामुळे कायम धुमसत असलेले जम्मू काश्मीर हे राज्य इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामात (IPL २०१९) आपला स्वतःचा संघ उतरवणार आहे. राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी याबाबत संकेत दिले आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे.

श्रीनगरच्या SKICC येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी असे संकेत दिले. ते म्हणाले की जम्मू-काश्मीरचा संघ आयपीएलच्या पुढच्या हंगामात आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकेल. तसेच येथे आयपीएल सामनेही खेळवले जातील आणि जम्मू काश्मीरचा संघ त्या सामन्यांचे यजमानपद भूषवेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जम्मू काश्मीरमधून अधिकाधिक क्रीडापटू तयार व्हावेत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. फुटबॉल, क्रिकेट, मॅरेथॉन आणि साहसी क्रीडा खेळात येथील खेळाडू आपली छाप पाडत आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा संघ IPLमध्ये खेळवता येईल का, यासाठी मी अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. लवकरच आयपीएलचे सामने जम्मू-काश्मिरमध्येही पाहायला मिळतील, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2018 6:31 pm

Web Title: ipl 2019 jammu kashmir team will feature in next ipl says governor
टॅग Ipl
Next Stories
1 Blog : आबा, तांबड्या मातीला पोरकं करुन गेलात !
2 Asia Cup 2018 : रायडू, केदारच्या पुनरागमनाचा संघाला फायदाच – रोहित शर्मा
3 ‘सर्वप्रथम रवी शास्त्रींना प्रशिक्षक पदावरून हटवा!’
Just Now!
X