आयपीएलच्या बाराव्या हंगामाला लिलाव नुकताच जयपूर शहरात पार पडला. अनेक दिग्गज खेळाडूंना आश्चर्याचा धक्का देत यंदाच्या हंगामात नवोदीत खेळाडूंनी कोट्यवधी रुपयांच्या बोली घेतल्या. लिलावानंतर आयपीएल संघमालकांना खेळाडूंची अदलाबदल करण्याची संधी मिळते. यानुसार दिल्ली कॅपिटल्स संघाने आपला खेळाडू जयंत यादवला मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्याची परवानगी दिली आहे. दोन्ही संघामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार जयंत यादव आगामी हंगामात मुंबईच्या संघाकडून खेळेल, अशी माहिती आयपीएलच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

बाराव्या हंगामासाठी असा असेल मुंबई इंडियन्सचा संघ – 

रोहित शर्मा (कर्णधार), अॅडम मिलने, आदित्य तरे, अनुकूल रॉय, बेन कटिंग, एविन लुईस, हार्दिक पांड्या, इशान किशन, जेसन बेहरनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, मयांक मार्कंडे, मिचेल मॅक्लेनघन, क्विंटन डी-कॉक, राहुल चहर, सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, युवराज सिंह, लसिथ मलिंगा, बरिंदर सरन, अनमोलप्रीत सिंह, पंकज जैसवाल, रसिख दार, जयंत यादव