26 October 2020

News Flash

IPL 2019 : कामगिरीवरुन ट्रोल करणाऱ्याला उनाडकटचं सडेतोड प्रत्युत्तर

उनाडकटची यंदाची कामगिरी फारशी चांगली नाही

आयपीएलच्या बाराव्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाच्या बाद फेरीत प्रवेश करण्याच्या आशांवर पाणी फिरलं आहे. अखेरचा साखळी सामना खेळणाऱ्या राजस्थानला दिल्लीच्या संघाने ५ गडी राखून हरवलं. राजस्थानच्या गोलंदाजांची या हंगामातली कामगिरीही फारशी चांगली झाली नाही. सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या जयदेव उनाडकटला यंदा आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

त्याच्या याच कामगिरीवरुन ट्विटरवर एका व्यक्तीने उनाडकटला ट्रोल करत, कोणत्यातरी अकादमीत जाऊन गोलंदाजी कशी करतात हे शिकून घे असा सल्ला दिला. या ट्रोलिंगला उनाडकटनेही तितक्याच समर्पक भाषेत उत्तर दिलं आहे.

गेले दोन हंगाम राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. त्यामुळे पुढच्या हंगामात उनाडकटला राजस्थानच्या संघात जागा मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 4:02 pm

Web Title: ipl 2019 jaydev unadkat shuts down troll who asked him to enroll in a cricket academy to learn bowling
Next Stories
1 IPL 2019 : चहलचा पराक्रम! केलं अनोखं शतक
2 अखेरच्या सामन्यात पंजाबची चेन्नईवर मात, लोकेश राहुलचं आक्रमक अर्धशतक
3 IPL 2019 : सेहवागला मागे टाकून ऋषभ पंत ठरला षटकारांचा बादशहा
Just Now!
X