News Flash

IPL 2019 : बाद फेरीत पोहचलेल्या दिल्लीला धक्का, कगिसो रबाडा स्पर्धेबाहेर

रबाडा मायदेशी परतणार

तब्बल ७ वर्षांनी आयपीएलची बाद फेरी गाठणाऱ्या दिल्लीच्या संघाला धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज कगिसो रबाडा दुखापतीमुळे पुढचे सामने खेळू शकणार नाहीये. दिल्लीच्या संघाने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन रबाडा आपल्या मायदेशी रवाना झाला आहे.

कगिसो रबाडाला पाठीच्या दुखापतीमुळे चेन्नईविरुद्ध सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मात्र विश्वचषकासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्याला मायदेशी बोलावलं आहे. रबाडाने आतापर्यंत १२ सामन्यांत २५ बळी घेतले असून, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रबाडा पहिल्या स्थानावर आहे.

अशा महत्वाच्या प्रसंगी संघाला सोडून परतणं हे आपल्यासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचं रबाडाने यावेळी बोलताना सांगितलं. मात्र दिल्लीचा संघ विजेतेपद पटकावेल असा आत्मविश्वासही रबाडाने यावेळी बोलताना व्यक्त केला. रबाडाची उणीव आपल्या संघाला भासेल, मात्र आतापर्यंत करत आलेली कामगिरी पुढील सामन्यांमध्ये कायम ठेवण्याचा मानस मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग याने व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 3:31 pm

Web Title: ipl 2019 kagiso rabada ruled out of remainder of ipl south africa call pacer back
टॅग : IPL 2019
Next Stories
1 श्रीशांतकडून राहुल द्रविडला शिवीगाळ !
2 ‘गौतम गंभीर खूप अहंकारी खेळाडू’; आत्मचरित्रात आफ्रिदीची फटकेबाजी
3 ipl 2019 : दोन्ही संघांचे गुण समान असल्याने चुरस
Just Now!
X