आयपीएलच्या बाराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखला आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये चेन्नईला केवळ दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्स आणि सनराईजर्स हैदराबाद या संघांनी चेन्नईला पराभवचा धक्का दिला आहे. १४ गुणांसह चेन्नईचा संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलमध्ये चाहत्यांची सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेला संघ म्हणून चेन्नईच्या संघाची ओळख आहे. या कारणासाठी चेन्नईचं संघ व्यवस्थापन आणि खेळाडू सोशल मीडियावर नेहमी हजर असतात. खेळाडूंनी सोशल मीडीयावर केलेल्या प्रत्येक पोस्टला चाहते मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवतात. चेन्नईच्या संघाचा महत्वाचा भाग असलेल्या केदार जाधवने धोनीसोबतचा असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीला जेवण भरवतानाचा व्हिडीओ केदारने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

केदारने अपलोड केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनीने विश्रांती घेतल्यामुळे सुरेश रैनाने संघाचं नेतृत्व केलं. या सामन्यात हैदराबादने चेन्नईवर मात केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 kedar jadhav feeds ms dhoni from his plate calls it bromance
First published on: 18-04-2019 at 16:55 IST