News Flash

IPL 2019 : …आणि कुलदीपला मैदानावरच रडू कोसळलं

बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात घडली हृदयद्रावक घटना

IPL 2019 KKR vs RCB : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शुक्रवारी हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्यांच्याच मैदानात १० धावांनी मात देत बंगळुरुने धडाकेबाज कामगिरी केली आहे. २१४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र मधल्या फळीत नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी करत कोलकाताला आशा दाखवल्या. पण अखेर संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.

या सामन्यात एक हृदयद्रावक प्रसंग पाहायला मिळाला. विराट-मोईन जोडीने कोलकात्याचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला लक्ष्य केलं. कुलदीपच्या ४ षटकात बंगळुरुच्या फलंदाजांनी ५९ धावा कुटल्या. या कामगिरीमुळे कुलदीप यादव IPL मध्ये सर्वात महागडा गोलंदाज ठरला. कोलकाताकडून १४व्या षटकापर्यंत सारं काही नीट होतं. पण त्यानंतर कुलदीप यादवने फेकलेल्या षटकानंतर समीकरण पूर्ण बदलून गेलं. त्याच्या त्या षटकात तब्बल २७ धावा मोईन अलीने लुटल्या. या घटनेनंतर कुलदीपला अश्रू अनावर झाले आणि त्याला मैदानावरच रडू कोसळल्याचे दिसून आले.

कुलदीपला अश्रू अनावर

 

या घटनेनंतर ट्विटरवर भारतीय पाठीराख्यांनी ट्विट करत ‘अशा प्रकारच्या घटना खेळात घडतात. तू वाईट वाटून घेऊ नको. भविष्यात तू नक्की चांगली कामगिरी करशील’ अशा पद्धतीचे ट्विट करून त्याला पाठिंबा दर्शविला.

दरम्यान, सलामीवीर ख्रिस लिन, सुनील नरिन आणि शुभमन गिल हे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. डेल स्टेन आणि नवदीप सैनीने त्यांना माघारी धाडलं. यानंतर भरवशाचा रॉबिन उथप्पाही झटपट माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये ते अपयशी ठरले. नितीश आणि रसेल या दोन्ही खेळाडूंनी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. नितीश राणाने नाबाद ८५ तर रसेलने ६६ धावा केल्या.

त्याआधी, कर्णधार विराट कोहलीचं आक्रमक शतक आणि मोईन अलीने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २१३ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर बंगळुरुच्या फलंदाजांनी आज आश्वासक फलंदाजी केली. मोईन अलीने ६६ तर कर्णधार विराट कोहलीने ५८ चेंडूत १०० धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर पार्थिव पटेल आणि अक्षदीप नाथ झटपट माघारी परतले. मात्र यानंतर विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या भागीदारीमुळेच बंगळुरुने आजच्या सामन्यात आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला. कोलकात्याकडून सुनील नरीन, आंद्रे रसेल, हॅरी गुर्ने आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:05 pm

Web Title: ipl 2019 kkr vs rcb kolkata bowler kuldeep yadav breaks down after moeen ali slams him for 27 runs
टॅग : IPL 2019
Next Stories
1 ipl 2019 : धडपडणाऱ्या राजस्थानसमोर मुंबईचे आव्हान
2 ipl 2019 : तिसऱ्या स्थानासाठी दिल्ली, पंजाबमध्ये झुंज
3 व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धा : विकास कृष्णनची दुसरी लढत शनिवारी न्यू यॉर्कमध्ये रंगणार
Just Now!
X