27 October 2020

News Flash

IPL 2019 : आक्रमक शतकी खेळीसह विराटचा विक्रम, दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे

विराटच्या आक्रमक १०० धावा

आयपीएलच्या बाराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या पहिल्या शतकी खेळीची नोंद केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विराटने ५८ चेंडूत १०० धावा पटकावल्या. कोलकात्याच्या गोलंदाजांची धुलाई करताना विराटने ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. या खेळीदरम्यान विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. कोहलीचं आयपीएलमधलं हे पाचवं शतक ठरलं आहे. कोहलीने डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, एबी डिव्हीलियर्स यांना मागे टाकलं आहे. या यादीत ख्रिस गेल हा विराटच्या पुढे आहे. गेलच्या नावावर ६ शतकं जमा आहेत.

दरम्यान, कोहलीचं आक्रमक शतक आणि मोईन अलीने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २१३ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर बंगळुरुच्या फलंदाजांनी आश्वासक फलंदाजी केली. मोईन अलीने ६६ तर कर्णधार विराट कोहलीने ५८ चेंडूत १०० धावांची खेळी केली. विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या भागीदारीमुळेच बंगळुरुने आजच्या सामन्यात आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 10:01 pm

Web Title: ipl 2019 kkr vs rcb virat kohli slams his 5th ton in ipl creates unique record
Next Stories
1 बंगळुरुने थोपवलं रसेलचं वादळ, कोलकात्यावर मात करुन दुसऱ्या विजयाची नोंद
2 विश्वचषकातून डावललेल्या अजिंक्यने शोधला पर्याय, नवीन संघाकडून खेळण्याची तयारी
3 जोफ्रा आर्चर वर्ल्डकपला मुकला तर नग्न होणं पत्करेन – मायकल वॉन
Just Now!
X