IPL 2019 KKR vs SRH Updates : IPL 2019 मधील कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात कोलकाताने ६ गडी राखून विजय मिळवला. १८२ धावांचे आव्हान पार करताना आंद्रे रसलने वादळी खेळी करत १९ चेंडूत ४९ धावा केल्या. तसेच नितीश राणाने अर्धशतकी खेळी केली. या खेळींच्या जोरावर KKR ने आपल्या हंगामाची विजयी सुरुवात केली.

वॉर्नरने केलेल्या ८५ धावा आणि विजय शंकरची शेवटच्या टप्प्यातील फटकेबाजी याच्या बळावर SRH ने ३ बाद १८१ धावा केल्या आणि KKR पुढे १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस लीनने एक उत्तुंग षटकार लगावत चांगली सुरुवात केली होती. मात्र पुढच्या फटक्याच्या वेळी तो झेलबाद झाला. त्याने केवळ ७ धावा केल्या. शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर राशिद खानने त्याचा झेल घेतला. अनुभवी फटकेबाज फलंदाज रॉबिन उथप्पा ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला आणि KKR ला दुसरा धक्का बसला. त्याला सिद्धार्थ कौल याने त्रिफळाचीत करून माघारी धाडले. उथप्पाने २७ चेंडूत ३५ धावा करत ३ चौकार आणि १ षटकार खेचला. रॉबिन उथप्पा पाठोपाठ लगेचच दिनेश कार्तिक बाद झाला. कर्णधारपदाची जबाबदारी असल्यामुळे दिनेश कार्तिककडून संयमी आणि जबाबदारी खेळी पाहायला मिळेल अशी साऱ्यांची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. ४ चेंडूत २ धावा करून तो झेलबाद झाला. नितीश राणाने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार फटकावले. सामन्यात १५.२ षटकांचा खेळ झाल्यावर फ्लडलाईट्समधील बिघाडामुळे सामना थांबवण्यात आला होता. पण सामना पुन्हा सुरु करण्यात आला. पण त्यानंतर लगेचच तो पायचीत झाला. त्याला रशीद खानने बाद केले. त्याने ८ चौकार आणि ३ षटकार खेचले.

तत्पूर्वी सामन्यात कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करत संयमी सुरुवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी सहाव्या षटकात संघाला अर्धशतक गाठून दिले. त्यानंतर आंद्रे रसलच्या गोलंदाजीवर वॉर्नरने षटकार लगावला आणि आपले यंदाच्या IPL मधील पहिले अर्धशतक झळकवले. हे त्याचे IPL कारकिर्दीतील ३७ वे अर्धशतक ठरले. वॉर्नर आणि बेअरस्टो यांनी शतकी सलामी दिली, पण त्या भागीदारीनंतर KKR ला अखेर यश मिळाले. पियुष चावल्याच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टो त्रिफळाचीत झाला. त्याने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. वॉर्नरने फटकेबाजी सुरु ठेवली. पण झंझावाती खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचा रॉबिन उथप्पाने अप्रतिम झेल घेतला आणि तो ८५ धावांवर बाद झाला. ५३ चेंडूच्या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले. पाठोपाठ अनुभवी धोकादायक फलंदाज युसूफ पठाण फारसा प्रभाव पाडू शकला नाही. रसलच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला आणि SRH ला तिसरा धक्का बसला. त्याने १ धाव केली. विजय शंकरने नाबाद ४० धावा केल्या.

Live Blog

19:45 (IST)24 Mar 2019
अर्धशतकवीर राणा पायचीत; SRH चे सामन्यात ‘कमबॅक’

सामन्यात १५.२ षटकांचा खेळ झाल्यावर फ्लडलाईट्समधील बिघाडामुळे सामना थांबवण्यात आला होता. पण सामना पुन्हा सुरु करण्यात आला. त्यानंतर लगेचच तो पायचीत झाला. त्याला रशीद खानने बाद केले. त्याने ८ चौकार आणि ३ षटकार खेचले.

19:07 (IST)24 Mar 2019
नितीश राणचे अर्धशतक

नितीश राणाने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार फटकावले.

19:01 (IST)24 Mar 2019
कार्तिक बाद; KKR चे ३ गडी माघारी

रॉबिन उथप्पा पाठोपाठ लगेचच दिनेश कार्तिक बाद झाला. कर्णधारपदाची जबाबदारी असल्यामुळे दिनेश कार्तिककडून संयमी आणि जबाबदारी खेळी पाहायला मिळेल अशी साऱ्यांची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. ४ चेंडूत २ धावा करून तो झेलबाद झाला.

18:55 (IST)24 Mar 2019
उथप्पा ३५ धावांवर त्रिफळाचीत; KKR ला दुसरा धक्का

अनुभवी फटकेबाज फलंदाज रॉबिन उथप्पा ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला आणि KKR ला दुसरा धक्का बसला. त्याला सिद्धार्थ कौल याने त्रिफळाचीत करून माघारी धाडले. उथप्पाने २७ चेंडूत ३५ धावा करत ३ चौकार आणि १ षटकार खेचला.

18:12 (IST)24 Mar 2019
कोलकात्याला पहिला धक्का, ख्रिस लीन माघारी

ख्रिस लीनने एक उत्तुंग षटकार लगावत चांगली सुरुवात केली होती. मात्र पुढच्या फटक्याच्या वेळी तो झेलबाद झाला. त्याने केवळ ७ धावा केल्या. शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर राशिद खानने त्याचा झेल घेतला.

17:43 (IST)24 Mar 2019
वॉर्नरचे धडाक्यात पुनरागमन; KKR पुढे १८२ धावांचे आव्हान

वॉर्नरने केलेल्या ८५ धावा आणि विजय शंकरची शेवटच्या टप्प्यातील फटकेबाजी याच्या बळावर SRH ने KKR पुढे १८२ धावांचे आव्हान ठेवले. प्रथम गोलंदाजी करत SRH च्या फलंदाजांनी ३ बाद १८१ धावा केल्या.

17:28 (IST)24 Mar 2019
युसूफ पठाण त्रिफळाचीत; SRH ला तिसरा धक्का

अनुभवी धोकादायक फलंदाज युसूफ पठाण फारसा प्रभाव पाडू शकला नाही. रसलच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला आणि SRH ला तिसरा धक्का बसला. त्याने १ धाव केली.

17:19 (IST)24 Mar 2019
उथप्पाने घेतला अप्रतिम झेल, वॉर्नर ८५ धावांवर बाद

झंझावाती खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचा रॉबिन उथप्पाने अप्रतिम झेल घेतला आणि तो ८५ धावांवर बाद झाला. ५३ चेंडूच्या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले.

17:03 (IST)24 Mar 2019
शतकी भागीदारीनंतर KKR ला यश, बेअरस्टो त्रिफळाचीत

वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्यात शतकी भागीदारी झाल्यानंतर KKR ला अखेर यश मिळाले. पियुष चावल्याच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टो त्रिफळाचीत झाला. त्याने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता.

16:45 (IST)24 Mar 2019
वॉर्नरचा धमाकेदार 'कमबॅक'; ३१ चेंडूत ठोकले अर्धशतक

आंद्रे रसलच्या गोलंदाजीवर वॉर्नरने षटकार लगावला आणि आपले यंदाच्या IPL मधील पहिले अर्धशतक झळकवले. हे त्याचे IPL कारकिर्दीतील ३७ वे अर्धशतक ठरले. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार लगावला.

16:29 (IST)24 Mar 2019
हैदराबादची संयमी सुरुवात; ६ व्या षटकात अर्धशतक

हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करत संयमी सुरुवात केली आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी सहाव्या षटकात संघाला अर्धशतक गाठून दिले. या अर्धशतकी टप्प्यात वॉर्नरने ३० तर बेअरस्टोने १६ धावा केल्या.

16:12 (IST)24 Mar 2019
KKR ने रिव्ह्यू गमावला

डेव्हिड वॉर्नरने २ चौकार लागवल्यानंतर तिसरा चेंडू पियुष चावलाने गुगली टाकला. या चेंडूवर केलेले अपील पंचानी फेटाळले. त्यामुळे KKR ने DRS ची मदत घेतली. पण हा चेंडू स्टंपच्या रेषेबाहेर असल्याने त्यांचा रिव्ह्यू वाया गेला.

15:38 (IST)24 Mar 2019
नाणेफेक जिंकून कोलकाताची प्रथम गोलंदाजी

कोलकाता आणि हैदराबाद हे दोनही संघ सलामीच्या सामन्यासाठी सज्ज आहेत. सामन्यात कोलकाताच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाताच्या संघाची धुरा दिनेश कार्तिक याच्याकडे आहे, तर हैदराबादच्या संघाचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार करणार आहे.