News Flash

कोलकाता नाइट रायडर्सचे सर्व सामने ईडन गार्डन्सवरच

सहा आठवडे रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५६ सामने होणार आहेत.

| March 21, 2019 12:14 am

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सात सत्रांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असल्या तरी दोन वेळा विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील  सर्व सामने ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २३ मार्च ते ५ मे या दरम्यान होणाऱ्या राऊंड रॉबिन लीग सामन्यांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. सहा आठवडे रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५६ सामने होणार आहेत. राऊंड रॉबिनमधील १२ सामने दुपारी ४ वाजता सुरू होणार आहेत.

देशात १२ एप्रिल ते १९ मे या कालावधीत सात टप्प्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असल्या तरी प्रत्येक संघ आपले घरच्या मैदानावरील सामने पर्यायी ठिकाणी खेळणार नाही. किंग्ज ईलेव्हन पंजाबचेही सर्व सामने मोहालीत होणार आहेत.

मुंबई इंडियन्सचे वानखेडे स्टेडियमवरील सामने

तारीख              सामना                               वेळ

२४ मार्च       वि. दिल्ली कॅपिटल्स                रात्री ८ वा.

३ एप्रिल       वि. चेन्नई सुपर किंग्ज            रात्री ८ वा.

१० एप्रिल      वि. किंग्ज ईलेव्हन पंजाब       रात्री ८ वा.

१३ एप्रिल      वि. राजस्थान रॉयल्स             दुपारी ४ वा.

१५ एप्रिल      वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु       रात्री ८ वा.

२ मे         वि. सनरायझर्स हैदराबाद              रात्री ८ वा.

५ मे         वि. कोलकाता नाइट रायडर्स          रात्री ८ वा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 12:14 am

Web Title: ipl 2019 kolkata knight riders to play all home matches at eden gardens
टॅग : IPL 2019
Next Stories
1 भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकासाठी लवकरच जाहिरात
2 IPL 2019 : स्पर्धेआधीच KKR ला झटका; ‘या’ खेळाडूची माघार
3 Video : ‘जिद है… तो है!’; पहा धोनीच्या वेब सीरिजचा धमाकेदार टीझर
Just Now!
X