वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईवर 37 धावांनी मात करत, बाराव्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने, बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मंगळवारी अजय देवगणने आपल्या वयाच्या पन्नाशीत पदार्पण केलं.

कृणालने दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार करत अजय देवगणनेही त्याला, माझ्यासोबत डबल रोलची भूमिका असलेला सिनेमा करशील का?? अशी ऑफरही दिली.

अजय देवगणच्या या ऑफरचा कृणालनेही तात्काळ स्विकार केला, मात्र त्याआधी कृणालनेही त्याला एक अट घातली.

दरम्यान 171 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजीची पुरती घसरगुंडी उडाली. मराठमोळ्या केदार जाधवचा अपवाद वगळता एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजाचा सामना करु शकला नाही. अखेरच्या षटकात चेन्नईच्या फलंदाजांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी त्यांचे प्रयत्न सफल होऊ दिले नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हा शंभरावा विजय ठरला. आतापर्यंत एकाही संघाला अशी कामगिरी करणं जमलेलं नाहीये.