News Flash

IPL 2019 : पंजाबने १९ धावांत गमावले तब्बल ५ बळी

प्रथम फलंदाजी करत पंजाबने केल्या ९ बाद १६६ धावा

IPL 2019 KXIP vs DC : दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत ९ बाद १६६ धावांपर्यंत मजल मारली. डेव्हिड मिलर (४३), सर्फराझ खान (३९) आणि मनदीप सिंग (नाबाद २९) यांच्या झुंजार खेळीच्या जोरावर पंजाबने दिल्लीला १६७ धावांचे आव्हान दिले. मात्र या डावात पंजाबने शेवटचे ५ गडी हे केवळ १९ धावांत गमावले.

प्रथम फलंदाजी करताना ११ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार लगावत धडाकेबाज सुरुवात करणारा लोकेश राहुल झेलबाद झाला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. त्याने १५ धावा केल्या. पंजाबच्या संघाने ख्रिस गेलच्या जागी सॅम करन याला सलामीला फलंदाजीसाठी पाठवण्याचा प्रयोग केला होता. मात्र हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही. तो १० चेंडूत २० धावा करून पायचीत झाला. त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचले, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईविरुद्धच्या सामन्यात चांगली खेळी करणारा मयंक अग्रवाल य सामन्यात ६ धावांवर बाद झाला. सर्फराझ खानशी झालेल्या गोंधळामुळे तो धावबाद झाला आणि पंजाबचा तिसरा गडी माघारी परतला. खेळपट्टीवर स्थिरावलेला सर्फराझ खान संदीप लामीचन्नेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि पंजाबला चौथा धक्का बसला. त्याने २९ चेंडूत ६ चौकरांसह ३९ धावा केल्या.

सर्फराझने मिलरला चांगली साथ दिली होती, पण तो बाद झाल्यावरही मिलरने फट्करबाजी सुरूच ठेवली. शेवटची काही षटके शिल्लक राहिली असताना पंजाबचा डाव ४ बाद १३७ असा होता. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात डेव्हिड मिलर झेलबाद झाला. मॉरिसच्या गोलंदाजीवर उंच उडालेला चेंडू ऋषभ पंतने झेलला आणि पंजाबला पाचवा झटका बसला. त्याने ४३ धावा केल्या. त्यानंतर झटपट गडी बाद झाले. फलंदाजीसाठी फारसा प्रचलित नसलेला हार्डस विल्जोएन केवळ १ धाव करून माघारी परतला आणि पंजाबला सहावा धक्का बसला. पाठोपाठ कर्णधार अश्विन त्रिफळाचीत झाला तर मुरुगन अश्विन झेलबाद झाला. रविचंद्रन अश्विनने ३ धावा केल्या, तर मुरुगन अश्विनला केवळ १ धाव जमवता आली. झटपट धावा जमवण्यासाठी चोरटी धाव घेताना मोहम्मद शमी पायचीत झाला. त्याने भोपळाही फोडला नाही. त्यामुळे ४ बाद १३७ वरून पंजाबचा डाव थेट ९ बाद १५६ धावांवर आला होता.

पण मनदीप सिंगने शेवटच्या २ चेंडूवर १ चौकार आणि १ षटकार खेचत पंजाबला १६६ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याने २१ चेंडूत नाबाद २९ धावांची उपयुक्त खेळी केली. त्याच्या संपूर्ण खेळीत २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 11:10 pm

Web Title: ipl 2019 kxip vs dc kxip punjab lost 5 wickets in 19 runs towards end
टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 KXIP vs DC : सॅम करनची हॅटट्रिक; पंजाबचा दिल्लीवर १४ धावांनी विजय
2 विराटसेनेचा ‘भीमपराक्रम’! सलग तिसऱ्यांदा ICC कडून मिळवली मानाची गदा
3 Koffee With Karan : ‘हार्दिक पांड्या हाजीर हो’; BCCI च्या लोकपालांचे आदेश
Just Now!
X