IPL 2019 KXIP vs RR Updates : मोहालीच्या मैदानावर पंजाबने पाहुण्या राजस्थानला १२ धावांनी धूळ चारली. राहुलचे अर्धशतक (५२) आणि मिलरची फटकेबाज खेळी (४०) यांच्या बळावर पंजाबने राजस्थानला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १७० धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात ११ चेंडूत ३१ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.

१८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या लयीत असलेला जोस बटलर झेलबाद झाला आणि राजस्थानला पहिला धक्का बसला. बटलरने १ चौकार आणि २ षटकार खेचत २३ धावा केल्या. अश्विनला आडवा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन त्रिफळाचीत झाला. सॅमसनने २१ चेंडूत २७ धावा केल्या.अजिंक्य रहाणेच्या ऐवजी सलामीला आलेला राहुल त्रिपाठी अर्धशतक करून माघारी परतला आणि राजस्थानला तिसरा धक्का बसला. त्याने ४५ चेंडूत ५० धावा केल्या. धोकादायक फलंदाज टर्नर हा मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि राजस्थानला चौथा धक्का बसला. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा जोफ्रा आर्चरदेखील लवकर बाद झाला.पाठोपाठ कर्णधार अजिंक्य रहाणे फटकेबाजीच्या नादात बाद झाला. त्याने २१ चेंडूत २६ धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीने फटकेबाजीत करत ११ चेंडूत ३१ धावा केल्या. पण त्याची फटकेबाजी राजस्थानला विजय मिळवून देऊ शकली नाही.

त्याआधी, राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तडाखेबाज फलंदाजी करणारा ख्रिस गेल बचावात्मक फटका खेळताना माघारी परतला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. गेलने २२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार खेचत ३० धावा केल्या. नव्या दमाचा मयंक अग्रवाल मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि पंजाबला दुसरा धक्का बसला. मयंकने १२ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार यांच्या साहाय्याने २६ धावा केल्या. अतिशय शांत आणि संयमी सुरुवात केलेल्या सलामीवीर लोकेश राहुलने चौकार लगावत ४५ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतकानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात लोकेश राहुल माघारी परतला. राहुलने ३ चौकार आणि २ षटकार खेचत ४७ चेंडूत ५२ धावा केल्या. निकोलस पुरन ६ चेंडूत ५ धावा करून माघारी परतला. मनदीप फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. मिलरने पंजाबच्या धावसंख्येत भर घालत मोलाचा वाटा उचलला. त्याने ४० धावा केल्या. अखेरच्या षटकात अश्विनने ४ चेंडूत १७ धावा करत पंजाबला १८२ धावांचा पल्ला गाठून दिला.

राजस्थानच्या संघातून स्टीव्ह स्मिथला वगळण्यात आले असून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू टर्नर याला संधी देण्यात आली आहे.

Live Blog

00:07 (IST)17 Apr 2019
पंजाबच्या गोलंदाजांचा भेदक मारा; राजस्थानावर १२ धावांनी विजय

मोहालीच्या मैदानावर पंजाबने पाहुण्या राजस्थानला १२ धावांनी धूळ चारली.  पंजाबने राजस्थानला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १७० धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात ११ चेंडूत ३१ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.

23:28 (IST)16 Apr 2019
कर्णधार रहाणे बाद; राजस्थान अडचणीत

पाठोपाठ कर्णधार अजिंक्य रहाणे फटकेबाजीच्या नादात बाद झाला. त्याने २१ चेंडूत २६ धावा केल्या.

23:23 (IST)16 Apr 2019
जोफ्रा आर्चर बाद; राजस्थानला पाचवा धक्का

फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा जोफ्रा आर्चरदेखील लवकर बाद झाला.

23:16 (IST)16 Apr 2019
धोकादायक टर्नर झेलबाद; राजस्थानला चौथा धक्का

धोकादायक फलंदाज टर्नर हा मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि राजस्थानला चौथा धक्का बसला. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

23:12 (IST)16 Apr 2019
अर्धशतक करून त्रिपाठी माघारी; राजस्थानला तिसरा धक्का

अजिंक्य रहाणेच्या ऐवजी सलामीला आलेला राहुल त्रिपाठी अर्धशतक करून माघारी परतला आणि राजस्थानला तिसरा धक्का बसला. त्याने ४५ चेंडूत ५० धावा केल्या.

22:50 (IST)16 Apr 2019
संजू सॅमसन त्रिफळाचीत; राजस्थानला दुसरा धक्का

अश्विनला आडवा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन त्रिफळाचीत झाला. सॅमसनने २१ चेंडूत २७ धावा केल्या.

22:17 (IST)16 Apr 2019
जोस बटलर झेलबाद; राजस्थानला पहिला धक्का

आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या लयीत असलेला जोस बटलर झेलबाद झाला आणि राजस्थानला पहिला धक्का बसला. बटलरने १ चौकार आणि २ षटकार खेचत २३ धावा केल्या.

21:43 (IST)16 Apr 2019
राहुल, मिलरची फटकेबाजी; राजस्थानला १८३ धावांचे लक्ष्य

सलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक (५२), डेव्हिड मिलरची फटकेबाज खेळी (४०) आणि अश्विनची ४ चेंडूत १७ धावांची खेळी यांच्या बळावर पंजाबने राजस्थानला १८३ धावांचे लक्ष्य दिले.

21:37 (IST)16 Apr 2019
मनदीप, मिलर बाद; पंजाबचे ६ गडी माघारी

मनदीप फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. मिलरने पंजाबच्या धावसंख्येत भर घालत मोलाचा वाटा उचलला. त्याने ४० धावा केल्या.

21:34 (IST)16 Apr 2019
निकोलस पुरन बाद; पंजाबला चौथा धक्का

निकोलस पुरन ६ चेंडूत ५ धावा करून माघारी परतला.

21:28 (IST)16 Apr 2019
अर्धशतकानंतर लगेच राहुल बाद; पंजाबला तिसरा धक्का

अर्धशतकानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात लोकेश राहुल माघारी परतला. राहुलने ३ चौकार आणि २ षटकार खेचत ४७ चेंडूत ५२ धावा केल्या.

21:22 (IST)16 Apr 2019
चौकार लगावत राहुलचे दमदार अर्धशतक

अतिशय शांत आणि संयमी सुरुवात केलेल्या सलामीवीर लोकेश राहुलने चौकार लगावत ४५ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले.

20:42 (IST)16 Apr 2019
मयंक अग्रवाल झेलबाद; पंजाबला दुसरा धक्का

नव्या दमाचा मयंक अग्रवाल मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि पंजाबला दुसरा धक्का बसला. मयंकने १२ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार यांच्या साहाय्याने २६ धावा केल्या. मयंक अग्रवाल झेलबाद; पंजाबला दुसरा धक्का

20:26 (IST)16 Apr 2019
ख्रिस गेल माघारी; पंजाबला पहिला धक्का

तडाखेबाज फलंदाजी करणारा ख्रिस गेल बचावात्मक फटका खेळताना माघारी परतला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. गेलने २२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार खेचत ३० धावा केल्या.

19:43 (IST)16 Apr 2019
नाणेफेक जिंकून राजस्थानची प्रथम गोलंदाजी

राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या संघातून स्टीव्ह स्मिथला वगळण्यात आले असून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू टर्नर याला संधी देण्यात आली आहे.