आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळण्याआधीच मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा पहिले 6 सामने खेळू शकणार नसल्याचं कळतंय. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या Super Provincial One-Day स्पर्धेत मलिंगा सहभागी होणार आहे.

“आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितलं होतं. यासाठी मला बोर्डाने होकार दिला असला, तरीही विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी सर्व खेळाडू हे Super Provincial One-Day स्पर्धा खेळणार आहेत. त्यामुळे देशाच्या विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी आयपीएलचे पहिले 6 सामने सोडण्यास मी तयार आहे. यासंबंधी बोर्डाच्या अधिकाराऱ्यांनी आयपीएल मुंबई इंडियन्सच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे.” मलिंगा EspnCricinfo संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

गतवर्षीच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून काम पाहिलेल्या मलिंगाने यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा खेळण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या हंगामात मुंबईने मलिंगावर 2 कोटीची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं होतं. याचसोबत न्यूझीलंडचा गोलंदाज अडम मिलनेही यंदा दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सकडून खेळू शकणार नाहीये. याबदल्यात विंडीजच्या अल्झारी जोसेफला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलं आहे.