गुणतालिकेतील पहिल्या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकातावर ७ गडी राखून विजय मिळवला. कोलकाताच्या सुमार फलंदाजीमुळे त्यांना २० षटकात केवळ १०८ धावा करता आल्या. चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिस याच्या नाबाद ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने १०९ धावांचे आव्हान ७ गडी राखून सहज पार केले. या सामन्यानंतर चेन्नईने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर उडी मारली असून पहिल्या क्रमांकावरील कोलकत्ता दुसऱ्या स्थानकावर घसरला आहे.

संघ सामनेविजयपराभवनेट रनरेटगूण
चेन्नई सुपरकिंग्ज651+ 0.310 10
कोलकाता नाईट रायडर्स642+ 0.6148
किंग्ज इलेव्हन पंजाब642– 0.0618
सनराईजर्स हैदराबाद633+ 0.8106
मुंबई इंडियन्स532+ 0.3426
दिल्ली कॅपिटल्स633+ 0.1316
राजस्थान रॉयल्स514– 0.8482
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु606– 1.4530