अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनीने पाचव्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने राजस्थान रॉयल्सवर ४ गडी राखून मात केली आहे. राजस्थानने विजयासाठी दिलेलं १५२ धावांचं आव्हान चेन्नईने अखेरच्या षटकात पूर्ण करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतकी खेळी केल्या. मुंबईबरोबर झालेल्या सामन्यातील पराभवानंतर हा चेन्नईचा सलग दुसरा विजय आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या कोलकाता संघाला धुळ चारल्यानंतर धोनीच्या संघाने कालच्या अतीतटीच्या सामन्यात राजस्थानवर निसटता विजय मिळवून गुणतालिकेतील आपले पहिले स्थान कायम राखले आहे.

तर दुसरीकडे राजस्थानची पराभवाची मालिका सुरुच असून चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर राजस्थानचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. या सामन्याआधीही राजस्थानचा संघ सातव्याच क्रमांकावर होता. या हंगामामध्ये अद्याप एकही विजय मिळवू न शकलेला बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सचा संघ गुणतालिकेमध्ये तळाला आहे. या पराभवामुळे राजस्थानचा पुढील फेरीत जाण्याचा मार्ग आणखीन खडतर झाला आहे. २५ व्या सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी आहेत पाहुयात…

संघ सामनेविजयपराभवनेट रनरेटगूण
चेन्नई सुपरकिंग्ज+ ०.२२९ १२
कोलकाता नाईट रायडर्स+ ०.६१४
मुंबई इंडियन्स+ ०.२९०
किंग्ज इलेव्हन पंजाब– ०.०५७
सनराईजर्स हैदराबाद+ ०.८१०
दिल्ली कॅपिटल्स+ ०.१३१
राजस्थान रॉयल्स– ०.७२५
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु– १.४५३