आयपीएलच्या बाराव्या हंगामात घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने, जम्मू-काश्मीरच्या रसिख सलाम दर या खेळाडूला जागा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 17 वर्षीय रसिख हा मुळचा जम्मू-काश्मीरचा खेळाडू आहे. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये रसिखने आपल्या गोलंदाजीने काहीकाळ शिखर धवनसारख्या फलंदाजाला चांगलंच अडचणीत आणलं होतं.

मुंबई इंडियन्सच्या या नवीन खेळाडुबद्दल आज काही अनोख्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • 17 वर्ष आणि 353 दिवस, मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणारा रसिख सलाम सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
  • रसिख मुळचा जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अश्मुजी गावचा रहिवासी आहे.
  • रसिख हा स्वभावाने लाजाळू आहे.
  • 2018 साली 19 वर्षाखालील कूचबिहार करंडक स्पर्धेदरम्यान रसिख मुंबई इंडियन्सच्या नजरेस आला होता.
  • रसिखने मुंबई इंडियन्सच्या नवी मुंबई येथे झालेल्या दोन ट्रेनिंग कँपला हजेरी लावली होती.
  • बाराव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने रसिखवर 20 लाखांची बोली लावली आहे.

रसिखला आयपीएलमधील आपल्या पहिल्या सामन्यात एकही बळी घेता आला नाही.