27 November 2020

News Flash

पोलार्डच्या वादळी खेळीत पंजाबची धुळधाण, मुंबई 3 गडी राखून विजयी

पोलार्डच्या आक्रमक 83 धावा

कर्णधार कायरन पोलार्डच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 3 गडी राखून मात केली. पंजाबचं 198 धावांचं आव्हान मुंबईने कायरन पोलार्डच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या इतर फलंदाजांनी चांगलीच निराशा केली, मात्र कायरन पोलार्डने एक बाजू लावून धरत कर्णधाराला साजेशी खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याने 83 धावांची खेळी केली.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेल्या सिद्धेश लाडने डावाची आक्रमक सुरुवात केली. मात्र या आक्रमक सुरुवातीचं मोठ्या खेळीत रुपांतर करणं त्याला जमलं नाही. यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने काहीकाळ पोलार्डची चांगली साथ दिली. यानंतर मुंबईचा डाव परत कोलमडला. मात्र यानंतर अल्झारी जोसेफच्या साथीने पोलार्डने मुंबईला परत विजयाच्या समीप आणून ठेवलं. मुंबई सामना जिंकणार असं वाटत असताना पोलार्ड अखेरच्या षटकात बाद झाला. अखेरीस अल्झारी जोसेफ आणि चहर यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.

सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुलने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबईसमोर विशाल आव्हान उभं केलं. मुंबईच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत पंजाबने 20 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 197 धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ आज आपल्या नेहमीच्या लयीमधघ्ये दिसलाच नाही. मधल्या षटकांमध्ये हार्दिक पांड्याने 2 बळी घेत, मुंबईला सामन्यात परत आणलं होतं. मात्र लोकेश राहुलने 19 व्या षटकात हार्दिकची धुलाई करत पुन्हा एकदा पंजाबचं पारडं जड केलं. अखेरच्या षटकात लोकेश राहुलने आपलं शतकही साजरं केलं. त्याने नाबाद 100 धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा मुंबईचा निर्णय पुरता फसला. सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांनी मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी झाली. ख्रिस गेलने सर्वप्रथम आपलं अर्धशतक साजरं केलं. अखेरीस जेसन बेहरनडॉर्फने गेलचा अडरस दूर केला. यानंतर हार्दिक पांड्याने डेव्हिड मिलर आणि करुण नायरला माघारी धाडलं. यानंतर जसप्रित बुमराहने सॅम करनचा बळी घेतला. मात्र अखेरच्या दोन षटकांमध्ये लोकेश राहुलने पुन्हा एकदा पंजाबच्या बाजुने सामना फिरवत, संघाची बाजू भक्कम केली.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

  • 21:11 (IST)

    अखेर पंजाबला पहिला धक्का, ख्रिस गेल माघारी

    जेसन बेहरनडॉर्फ घेतला बळी

  • 20:46 (IST)

    ख्रिस गेल - लोकेश राहुल जोडीची आक्रमक सुरुवात

    मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेत दोघांचीही अर्धशतकी भागीदारी

00:13 (IST)11 Apr 2019
अखेरीस मुंबई विजयी

जोसेफ आणि चहर जोडीकडून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब

00:09 (IST)11 Apr 2019
पोलार्ड माघारी, मुंबईला सातवा धक्का

अखेरच्या षटकात मुंबईला धक्का

23:48 (IST)10 Apr 2019
कर्णधार पोलार्डची झुंज सुरुच

पंजाबच्या गोलंदाजीचा सामना करत झळकावलं अर्धशतक

23:39 (IST)10 Apr 2019
मुंबईला सहावा धक्का, कृणाल पांड्या माघारी

शमीला सामन्यात आणखी एक बळी

23:32 (IST)10 Apr 2019
हार्दिक पांड्या माघारी, मुंबईला पाचवा धक्का

मोहम्मद शमीने घेतला बळी

23:16 (IST)10 Apr 2019
मुंबईचा चौधा गडी माघारी

इशान किशन धावबाद

22:52 (IST)10 Apr 2019
क्विंटन डी-कॉक माघारी, मुंबईला तिसरा धक्का

कर्णधार रविचंद्रन आश्विनने घेतला बळी

22:48 (IST)10 Apr 2019
मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव माघारी

सॅम करनने घेतला बळी

22:28 (IST)10 Apr 2019
मुंबईला पहिला धक्का, सिद्धेश लाड माघारी

मोहम्मद शमीने उडवला लाडचा त्रिफळा

21:54 (IST)10 Apr 2019
अखेरच्या षटकात लोकेश राहुलची फटकेबाजी, झळकावलं धडाकेबाज शतक

पंजाबची 197 धावांपर्यंत मजल, मुंबईला विजयासाठी 198 धावांचं आव्हान

21:53 (IST)10 Apr 2019
पंजाबला चौथा धक्का

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सॅम करन माघारी

21:33 (IST)10 Apr 2019
पंजाबला तिसरा धक्का, करुण नायर माघारी

मुंबईचं सामन्यात दमदार पुनरागमन, पंजाबच्या धावगतीला अंकुश

21:25 (IST)10 Apr 2019
पंजाबला दुसरा धक्का, मिलर माघारी

हार्दिक पांड्याने घेतला बळी

21:11 (IST)10 Apr 2019
अखेर पंजाबला पहिला धक्का, ख्रिस गेल माघारी

जेसन बेहरनडॉर्फ घेतला बळी

20:46 (IST)10 Apr 2019
ख्रिस गेल - लोकेश राहुल जोडीची आक्रमक सुरुवात

मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेत दोघांचीही अर्धशतकी भागीदारी

20:27 (IST)10 Apr 2019
नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम गोलंदाजी, पंजाबची आक्रमक सुरुवात

ख्रिस गेल आणि मयांक अग्रवाल जोडीची फटकेबाजी

टॅग IPL 2019
Next Stories
1 वय, अवघे 3 महिने ! रोहितची चिमुरडी शिकतेय स्पॅनिश…हा व्हिडीओ जरुर पाहा
2 BLOG : सिद्धार्थ देसाईचा जयदेव उनाडकट होऊ नये हीच अपेक्षा !
3 IPL 2019 : धोनी-साक्षीचे विमानतळावरील ‘कूल’ वर्तन, जमिनीवर पसरली पथारी
Just Now!
X