मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नरने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर सनराईजर्स हैदराबाद संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हैदराबादने चेन्नईच्या गोलंदाजांचा व्यवस्थित समाचार घेतला. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने ५७ तर मनिष पांडेने नाबाद ८३ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी केलेल्या भागीदारीमुळे हैदराबादच्या संघाने आव्हानात्मक धावसंख्येचा टप्पा गाठला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – देशासाठी धोनीइतकं योगदान कोणत्याही खेळाडूने दिलं नाही – कपिल देव

डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेची ही जोडी अखेरीस हरभजनने फोडली. वॉर्नरचं अर्धशतक झाल्यानंतर, हरभजनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात वॉर्नर फसला….आणि पुढे काही कळण्याच्या आतच धोनीने स्टम्पिंग करुन वॉर्नरला माघारी परतण्याचा रस्ता खुला करुन दिला. धोनीच्या या तेजतर्रार स्टम्पिंगचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

दरम्यान, चेन्नईविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नरने स्थान मिळवलं आहे. शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिन्ही फलंदाजांनी चेन्नईविरुद्ध ६ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. याचसोबत सातत्याने अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नरने विरेंद्र सेहवाग आणि जोस बटलरशी बरोबरी केली आहे. बाराव्या हंगामात वॉर्नरने सलग ५ वेळा अर्धशतकं झळकावली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 ms dhoni sends david warner packing with lightning quick stumping
First published on: 23-04-2019 at 23:06 IST