27 September 2020

News Flash

IPL 2019 : वानखेडेच्या कर्मचाऱ्यांसोबत धोनी-हरभजन-रैनाचं खास फोटोसेशन

मुंबईसमोर चेन्नईचं आव्हान

आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज हे संघ, आज वानखेडे मैदानावर समोरासमोर येणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांचा वानखेडे मैदानावर सराव सुरु आहे. या सामन्याआधी महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, हरभजन सिंह आणि झहीर खान या खेळाडूंनी, वानखेडे मैदानावरच्या कर्मचाऱ्यांसोबत खास फोटोसेशन केलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या ट्विटर हँडलने, हा खास फोटो शेअर केला आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांचे सामने नेहमी रंगतदार होत असतात. चेन्नईने बाराव्या हंगामात आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले असून, मुंबईला केवळ बंगळुरुविरुद्धच्या सामन्यातच विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ आजच्या सामन्यात जरुर विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 3:49 pm

Web Title: ipl 2019 ms dhoni suresh raina harbhajan singh zaheer khan take special photo with sons of soil
टॅग IPL 2019
Next Stories
1 विश्वचषकासाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा, केन विल्यमसन संघाचा कर्णधार
2 बापरे…! द ग्रेट खलीही छोटा वाटेल इतका उंच भारतीय खेळाडू लवकरच WWE मध्ये
3 वयचोरी करणाऱ्या खेळाडूंवर बंदी घाला!
Just Now!
X