News Flash

Video : ‘जिद है… तो है!’; पहा धोनीच्या वेब सीरिजचा धमाकेदार टीझर

‘रोअर ऑफ द लायन’ नावाने धोनीच्या जीवनावर वेब सीरिज

Video : ‘जिद है… तो है!’; पहा धोनीच्या वेब सीरिजचा धमाकेदार टीझर

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या IPL च्या तयारीत व्यस्त आहे. IPL स्पर्धेत त्याची कामगिरी धडाकेबाज होणार का? याबाबत सध्या चर्चा रंगल्या आहेत. IPL चा १२ वा हंगाम सुरु होणार असल्याने या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघाच्या प्रवासावर नेटफ्लिक्स एक माहितीपट प्रदर्शित करत आहे. या पाठोपाठच धोनीचा आत्तापर्यंतचा प्रवासही त्याच्या चाहत्यांना एका वेब सीरिजच्या माध्यमातून पाहता येणार आहे. ‘रोअर ऑफ द लायन’ या नावाने धोनीवर माहितीपट / वेब सीरिज ‘हॉटस्टार’ घेऊन येत आहे. या वेब सीरिजचा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे.

या सीरिजचा एक व्हिडीओ ५ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या वेब सीरिजचा दुसरा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘काही वर्षांपूर्वी आमच्या संघावर आणि खेळाडूंवर प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्या प्रश्नाची आणि आरोपांची उत्तरे देणं गरजेचं होतं. काय करू.. जिद्द आहे म्हणजे आहेच…!’, असे या व्हिडीओत धोनी बोलताना दिसत आहे.

या आधीच्या टीझरमध्ये ‘एक कहानी हैं, जो आपने अब तक नही सुनी’ म्हणजेच ‘एक कहाणी जी तूम्ही अजून ऐकली नाही’, असे धोनी म्हणताना दिसत होता.

तसेच, लाखो चाहते मैदानात आणि मैदानाबाहेर धोनीला MSD, कॅप्टन कूल, थाला आणि अजून बरेच काही म्हणत असतात. त्याला प्रोत्साहन देत असतात. धोनीची गोष्ट सर्वांना माहित आहे किंवा तुम्ही असा विचार करता. पण त्याच्याकडे सांगण्यासारखे आणखी काही आहे. त्याच्या जवळच्या मित्रांनाही माहित नसलेली अशी ही दुसरी गोष्ट आहे, असे या शोच्या सारांशामध्ये म्हटले होते. या आशयामुळे आता धोनीबद्दलच्या माहितीपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2019 3:04 pm

Web Title: ipl 2019 ms dhoni web series teaser 2 zid hai toh hai hotstar
टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : नीता अंबानी यांनी केलं युवीचं धडाक्यात स्वागत, पहा खास फोटो
2 थरारक Super Over मध्ये आफ्रिकेचा श्रीलंकेवर विजय
3 IPL 2019 : पंजाबच्या संघाकडून पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना मदत