27 February 2021

News Flash

IPL 2019 : मुंबईच्या विजयाचा शिल्पकार अल्झारी जोसेफसाठी ‘विंडीज क्रिकेट’चे खास ट्विट

२२ वर्षाच्या अल्झारी जोसेफने केला अविश्वसनीय पराक्रम

IPL 2019 SRH vs MI Updates – सलग ३ सामने जिंकलेल्या हैदराबादचा अश्वमेध मुंबईने त्यांच्याच मैदानावर रोखला. १३७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव केवळ ९६ धावांत आटोपला. मुंबईने सामना ४० धावांनी जिंकला आणि आपली विजयी लय कायम राखली. आपला पहिला IPL सामना खेळणारा अल्झारी जोसेफ याने ६ बळी टिपत मुंबईला कठीण वाटणारा विजय मिळवून दिला. या सामन्यात मलिंगाच्या जागी संधी मिळालेल्या अल्झारी जोसेफ याने १२ धावांत ६ बळी टिपले. याबरोबरच त्याने IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी केली.

अल्झारी जोसेफच्या या अप्रतिम कामगिरीनंतर विंडीज क्रिकेटने त्याच्याबाबत एक खास ट्विट केले. त्यात त्याचा झकास फोटो वापरण्यात आला आहे. ‘अशा पद्धतीचे पदार्पण हे केवळ गोष्टींमध्ये / स्वप्नांमध्येच पाहिले होते. पण २२ वर्षाच्या अल्झारी जोसेफने हा अविश्वसनीय पराक्रम करून दाखवला.

मुंबई इंडियन्सनेदेखील त्याच्यासाठी खास ट्विट केले आहे. तसेच अनेकांनी ट्विट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, १३७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना धोकादायक सलामीवीर जॉनी बेअरस्टो लवकर माघारी परतला आणि हैदराबादला पहिला धक्का बसला. त्याने १० चेंडूत ३ चौकारांसह १६ धावा केल्या. चांगल्या लयीत असलेला डेव्हिड वॉर्नरदेखील पाठोपाठ त्रिफळाचीत झाला. अल्झारी जोसेफने IPL मधील आपल्या पहिल्याच षटकात हैदराबादला दुसरा धक्का दिला. वॉर्नरने १३ चेंडूत १५ धावा केल्या. विजय लगेच बाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या. आपला पहिला IPL सामना खेळणाऱ्या जोसेफने त्याला माघारी धाडत निर्धाव षटक टाकले. त्यानंतर मनीष पांडे आणि युसूफ पठाण एका पाठोपाठ झेलबाद झाले आणि हैदराबादचा निम्मा संघ गारद झाला. मनीषने १६ धावा केल्या, तर पठाण शून्यावर माघारी परतला. काही वेळात दीपक हुडा आणि रशीद खानदेखील सलग बाद झाले. दीपक हुडाने काही काळ संघर्ष करत २० धावा केल्या. पण त्याचा हैदराबादला फार उपयोग झाला नाही. रशीद खान पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर नबीने झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्याची झुंज मोडून काढण्यात आली. त्याने ११ धावा केल्या. पाठोपाठ भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल यांना माघारी पाठवत जोसेफने मुंबईला सामना जिंकवून दिला. त्याने १२ धावा देत ६ बळी टिपले.

त्याआधी हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमार याने पहिल्याच षटकात टाकलेला चेंडू रोहित शर्माच्या पायावर आदळला. पंचानी रोहितला नाबाद ठरवूनही हैदराबादने DRS चा पर्याय स्वीकारला. पण रिव्ह्यूमध्ये देखील तो नाबाद असल्याचे दिसून आले आणि हैदराबादला एकमेव रिव्ह्यूदेखील गमावावा लागला. पहिल्या षटकात नाबाद ठरवण्यात आलेला रोहित शर्मा अखेर चौथ्या षटकात माघारी परतला. मोहम्मद नबीच्या फिरकीचा समाचार घेण्याचा प्रयत्न करताना सीमारेषेवर तो झेलबाद झाला. रोहितने ११ धावा केल्या. मागील सामन्यात अर्धशतक ठोकणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. संदीप शर्माने त्याला ७ धावांवर बाद केले. चांगली सुरुवात मिळालेला सलामीवीर क्विंटन डी कॉक मोठा फटका खेळताना माघारी परतला आणि नवव्या षटकात मुंबईला तिसरा धक्का बसला. डी कॉकने १८ चेंडूत १९ धावा केल्या. IPL मध्ये आतापर्यंत उत्तम कामगिरी करणाऱ्या कृणाल पांड्याला या सामन्यात फारसा प्रभाव पाडता आला नाही. १३ चेंडूत ६ धावा करून तो तंबूत परतला. युवराजच्या जागी संघात स्थान मिळालेला ईशान किशन धावबाद झाला. किशनने २१ चेंडूत १७ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हार्दिक पांड्या या सामन्यात अपयशी ठरला. रशीद खानच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला आणि मुंबईचा सहावा गडी माघारी परतला, हार्दिकने १४ चेंडूत १४ धावा केल्या. फिरकीपटू राहुल चहर झटपट बाद झाला. मात्र त्याने २ चौकार लगावत १० धावा केल्या. फिरकीपटू राहुल चहर झटपट बाद झाला. मात्र त्याने २ चौकार लगावत १० धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात कायरन पोलार्डने फटकेबाजी केली. त्याने ४ षटकार आणि २ चौकार खेचत २६ चेंडूत नाबाद ४६ धावा ठोकल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 1:00 am

Web Title: ipl 2019 mumbai indians alzarri joseph got special praise from windies cricket
टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : …तेव्हा आईच्या निधनाचं दुःख विसरून मैदानावर उतरला होता अल्झारी जोसेफ
2 ..तर ऑलिम्पिक दिवास्वप्नच!
3 IPL 2019 : पदार्पणाच्या सामन्यात अल्झारीचे ६ बळी; केली IPL इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी
Just Now!
X