29 May 2020

News Flash

सांभाळून रहा, तुझ्या झिवाला पळवून नेईन ! जाणून घ्या कोणी दिली धोनीला धमकी

पंजाबविरुद्ध सामन्यानंतर घडला प्रकार

आयपीएलच्या बाराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जसमोर अंतिम फेरी गाठण्याचं मोठं उद्दीष्ट आहे. यासाठी त्यांना शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स संघाशी दोन हात करावे लागणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखणाऱ्या चेन्नईने अखेरचा साखळी सामना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळला. या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्यांचं बाद फेरीतलं स्थान हे कायम राहिलं.

या सामन्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सह-मालकीण प्रिती झिंटाने महेंद्रसिंह धोनीसोबतचा एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या ट्विटमध्ये प्रिती झिंटाने धोनीला चक्क त्याची मुलगी झिवाला पळवून नेईन अशी गमतीशीर धमकी दिली आहे.

यावेळी प्रितीने आपल्या संघाला पाठींबा देणाऱ्या चाहत्यांचेही आभार मानले.

मुंबई इंडियन्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात कोलकात्यावर मात केल्याने चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला. पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईने चेन्नईवर मात करुन थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मात्र चेन्नईचं आयपीएलमधलं आव्हान अजुन संपुष्टात आलेलं नाहीये, दिल्लीविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यास चेन्नईचा संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळवू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2019 2:31 pm

Web Title: ipl 2019 preity zinta funnily warns ms dhoni of kidnapping his daughter ziva
टॅग Csk,IPL 2019,Ms Dhoni
Next Stories
1 हार्दिक पांड्यावर दबाव टाकणं अयोग्य – कपिल देव
2 IPL 2019 : धक्कादायक! अंतिम सामना अवघ्या काही सेकंदात हाऊसफुल
3 दिल्ली जिंकली पण अमित मिश्राच्या रडीच्या डावावर टीका
Just Now!
X