04 July 2020

News Flash

IPL 2019 Qualifier 2 CSK vs DC : ‘चेन्नई’ एक्सप्रेस सुसाट! दिल्लीला नमवून अंतिम फेरीत

चेन्नईचे सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांची अर्धशतके

IPL 2019 Qualifier 2 CSK vs DC : क्वालिफायर २ सामन्यात चेन्नईने दिल्लीच्या संघावर ६ गडी राखून मात केली आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीच्या संघाने विजयासाठी चेन्नईला १४८ धावांचे माफक आव्हान दिले होते. चेन्नईचे सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने सहज विजय मिळवला. आता स्पर्धेच्या विजेतेपदासाठी चेन्नईला मुंबईशी झुंजावे लागणार आहे.

या सामन्यात १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीची षटके जपून खेळल्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि वॉटसन यांनी चेन्नईला धमाकेदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी आठव्या षटकात चेन्नईला अर्धशतकी सलामी करून दिली. यात डु प्लेसिसने फटकेबाजी केली, तर वॉटसनने संयमी पवित्रा राखला. आपली फटकेबाजी सुरु ठेवत फाफ डु प्लेसिस याने दमदार अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने ३७ चेंडू खेळले. डु प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच चेन्नईला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डु प्लेसिस झेलबाद झाला. त्याने ३९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५० धावा केल्या. त्याने वॉटसन बरोबर ८१ धावांची सलामी दिली.

आधी संयमी खेळी आणि नंतर तुफानी अर्धशतक ठोकल्यानंतर शेन वॉटसन माघारी परतला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकार यांच्या मदतीने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. पाठोपाठ बाचकत फलंदाजी करणारा सुरेश रैनाही स्वस्तात तंबूत परतला. त्याने केवळ ११ धावा केल्या. विजयासाठी २ धावा आवश्यक असताना धोनीला विजयी षटकार मारण्याचा मोह आवरला. त्यातच तो बाद झाला. अखेर रायडूने विजयी फटका लगावत विजयाची औपचारिकता पूर्ण केले.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. दिल्लीची फलंदाजी पुरती कोलमडली. ऋषभ पंत आणि कॉलिन मुनरोचा अपवाद वगळता दिल्लीचे फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजीचा सामना करु शकले नाहीत. सलामीवीर पृथ्वी शॉला माघारी धाडत दिपक चहरने दिल्लीला पहिला धक्का दिला. यानंतर शिखर धवनही हरभजन सिंहच्या गोलंदाजीचा शिकार होऊन माघारी परतला. यानंतर प्रत्येक फलंदाज एका मागोमाग एक माघारी परतत राहिल्यामुळे दिल्लीचा संघ भागीदारी उभारु शकला नाही. मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ही मोठी खेळी करु शकला नाही. त्याने दिल्लीकडून ३८ धावा केल्या.

चेन्नईकडून दिपक चहर, हरभजन सिंह, रविंद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. इम्रान ताहीरने १ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

 • 23:06 (IST)

  'चेन्नई' एक्सप्रेस सुसाट! दिल्लीला नमवून अंतिम फेरीत

  क्वालिफायर २ सामन्यात चेन्नईने दिल्लीच्या संघावर ६ गडी राखून मात केली आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.  आता स्पर्धेच्या विजेतेपदासाठी चेन्नईला मुंबईशी झुंजावे लागणार आहे.

 • 22:18 (IST)

  फाफ डु प्लेसिसचे दमदार अर्धशतक

  आपली फटकेबाजी सुरु ठेवत फाफ डु प्लेसिस याने दमदार अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने ३७ चेंडू खेळले.

 • 21:09 (IST)

  दिल्लीला आठवा धक्का, ऋषभ पंत माघारी

  दिपक चहरने घेतला बळी

 • 20:28 (IST)

  दिल्लीला चौथा धक्का, कर्णधार श्रेयस अय्यर बाद

  इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाने घेतला झेल

 • 19:47 (IST)

  दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ माघारी

  दिपक चहरने घेतला बळी, पृथ्वी पायचीत होऊन माघारी परतला

23:06 (IST)10 May 2019
'चेन्नई' एक्सप्रेस सुसाट! दिल्लीला नमवून अंतिम फेरीत

क्वालिफायर २ सामन्यात चेन्नईने दिल्लीच्या संघावर ६ गडी राखून मात केली आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.  आता स्पर्धेच्या विजेतेपदासाठी चेन्नईला मुंबईशी झुंजावे लागणार आहे.

22:45 (IST)10 May 2019
सुरेश रैना त्रिफळाचीत; चेन्नईला तिसरा धक्का

बाचकत फलंदाजी करणारा सुरेश रैना स्वस्तात तंबूत परतला. त्याने केवळ ११ धावा केल्या.

22:32 (IST)10 May 2019
तुफानी अर्धशतकानंतर वॉटसन माघारी

आधी संयमी खेळी आणि नंतर तुफानी अर्धशतक ठोकल्यानंतर शेन वॉटसन माघारी परतला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकार यांच्या मदतीने ३२ चेंडूत ५० धावा केल्या.

22:22 (IST)10 May 2019
अखेर चेन्नईला धक्का; डु प्लेसिस झेलबाद

डु प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच चेन्नईला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डु प्लेसिस झेलबाद झाला. त्याने ३९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५० धावा केल्या. त्याने वॉटसन बरोबर ८१ धावांची सलामी दिली.

22:18 (IST)10 May 2019
फाफ डु प्लेसिसचे दमदार अर्धशतक

आपली फटकेबाजी सुरु ठेवत फाफ डु प्लेसिस याने दमदार अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने ३७ चेंडू खेळले.

22:10 (IST)10 May 2019
चेन्नईची धमाकेदार सुरुवात; दिली अर्धशतकी सलामी

सुरुवातीची षटके जपून खेळल्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि वॉटसन यांनी चेन्नईला धमाकेदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी आठव्या षटकात चेन्नईला अर्धशतकी सलामी करून दिली. यात डु प्लेसिसने फटकेबाजी केली, तर वॉटसनने संयमी पवित्रा राखला.

21:19 (IST)10 May 2019
दिल्लीची १४७ धावांपर्यंत मजल

चेन्नईला विजयासाठी १४८ धावांचं आव्हान

21:15 (IST)10 May 2019
ट्रेंट बोल्ट माघारी, दिल्लीचा नववा गडी बाद

रविंद्र जाडेजाने उडवला बोल्टचा त्रिफळा

21:09 (IST)10 May 2019
दिल्लीला आठवा धक्का, ऋषभ पंत माघारी

दिपक चहरने घेतला बळी

21:04 (IST)10 May 2019
किमो पॉल माघारी, दिल्लीचा सातवा गडी तंबूत

ब्राव्होने उडवला पॉलचा त्रिफळा

20:53 (IST)10 May 2019
दिल्लीला सहावा धक्का, रुदरफोर्ड माघारी

हरभजन सिंहने घेतला बळी

20:36 (IST)10 May 2019
चेन्नईचा निम्मा संघ माघारी, अक्षर पटेल बाद

ब्राव्होने घेतला बळी

20:28 (IST)10 May 2019
दिल्लीला चौथा धक्का, कर्णधार श्रेयस अय्यर बाद

इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाने घेतला झेल

20:15 (IST)10 May 2019
दिल्लीची अडखळती सुरुवात, तिसरा गडी माघारी

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर कॉलिन मुनरो झेलबाद

20:03 (IST)10 May 2019
शिखर धवन माघारी, दिल्लीला दुसरा धक्का

हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनीने घेतला झेल

19:47 (IST)10 May 2019
दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ माघारी

दिपक चहरने घेतला बळी, पृथ्वी पायचीत होऊन माघारी परतला

19:26 (IST)10 May 2019
चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

मुरली विजय ऐवजी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश

दिल्लीच्या संघात कोणतेही बदल नाहीत

टॅग IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : ‘धोनीच्या चेन्नईने लिव्हरपूरकडून शिकावं’
2 IPL 2019 : ब्राव्हो ‘या’ विक्रमापासून अवघे एक पाऊल दूर
3 IPL 2019 : ….तर चेन्नईचा पराभव शक्य
Just Now!
X