13 December 2019

News Flash

IPL 2019 : रैनाला मागे टाकत कोहलीचा ‘विराट’ विक्रम

IPL मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजाचा बहुमान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहली, आयपीएलच्या बाराव्या हंगामात अनोखा बहुमान मिळवला आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या सुरेश रैनाला माघारी धाडत विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. शुक्रवारी घरच्या मैदानावर कोलकात्याविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराटने 84 धावांची खेळी केली. यादरम्यान विराटने हा विक्रम केला, सध्याच्या घडीच्या त्याच्या खात्यात 5110 धावा जमा आहेत.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीला हा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी होती. मात्र कोहलीला पहिल्या चार सामन्यांमध्ये सूर सापडला नाही. दुसरीकडे रैनाने मात्र, आवश्यक असलेल्या 15 धावा काढत सर्वात आधी 5 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा फलंदाज असा बहुमान मिळवला. सलग 4 सामन्यात अपयशी ठरल्यानंतर विराटने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा बहुमान मिळवला आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : विराट कोहलीला सूर गवसला, दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान

दरम्यान कोलकात्याविरुद्ध सामन्यात, बंगळुरुने आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर 205 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीला एबी डिव्हीलियर्सनेही चांगली साथ दिली. डिव्हीलियर्सनेही आपल्या जुन्या रंगात येत कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराटपाठोपाठ डिव्हीलियर्सनेही आपलं अर्धशतक झळकावलं. अखेरच्या षटकांमध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डिव्हीलियर्सही सुनिल नरीनचा शिकार बनला. त्याने 32 चेंडूत 63 धावा केल्या.

अवश्य वाचा – IPL 2019 : पंजाबविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होच्या समावेशावर प्रश्नचिन्ह

First Published on April 5, 2019 10:44 pm

Web Title: ipl 2019 rcb captain virat kohli becomes leading run scorer in ipl leaves behind suresh raina
Just Now!
X