विराट कोहलीने आयपीएलच्या बाराव्या हंगामातस कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात शतक झळकावत आपल्या संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराटने ५८ चेंडूत १०० धावा पटकावल्या. कोलकात्याच्या गोलंदाजांची धुलाई करताना विराटने ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. कर्णधार या नात्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने ख्रिस गेलला मागे टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ख्रिस गेलच्या नावावर ३ शतकं जमा आहेत, तर विराटचं कर्णधार या नात्याने हे पाचवं शतक ठरलं आहे. या यादीत मायकल क्लिंगर हा ६ शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. कोहलीचं आयपीएलमधलं हे पाचवं शतक ठरलं आहे. कोहलीने डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, एबी डिव्हीलियर्स यांना मागे टाकलं आहे. या यादीत ख्रिस गेल हा विराटच्या पुढे आहे. गेलच्या नावावर ६ शतकं जमा आहेत.

अवश्य वाचा – IPL 2019 : आक्रमक शतकी खेळीसह विराटचा विक्रम, दिग्गज खेळाडूंना टाकलं मागे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 rcb captain virat kohli leaves chirs gayle behind as most centuries in t 20 cricket as a captain
First published on: 19-04-2019 at 22:29 IST