IPL 2019 RCB vs CSK : बंगळुरूच्या मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात यजमान बंगळुरूने चेन्नईला एका धावेने पराभूत केले. शेवटच्या षटकात आवश्यक असलेल्या २६ धावांचा पाठलाग करताना धोनीने ५ चेंडूत २४ धावा फटकावल्या. मात्र अखेरच्या चेंडूवर यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने शार्दूल ठाकूरला चपळाईने बाद करून सामना बंगळुरूच्या नावे केला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकाकी झुंज देत ४८ चेंडूत ८४ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.

१६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली.आधी वॉटसन ५ धावांवर झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर स्टेनने रैनाचा (०) त्रिफळा उडवला. सलामीवीर फाफ डु प्लेसिस मोठा फटका खेळण्यासाठी सरसावला, पण तो फटका चुकला आणि डु प्लेसिस ५ धावांवर माघारी परतला. डु प्लेसिस सारखाच फटका खेळून केदार जाधवही तंबूत परतला आणि चेन्नईला २८ या धावसंख्येवर चौथा धक्का बसला. केदारने ९ धावा केल्या.

चार गडी झटपट बाद झाल्यानंतर अंबाती रायडूने धोनीच्या साथीने डाव सावरला, पण विजयासाठी आवश्यक असलेली धावगती गाठण्यासाठी त्याने फटकेबाजीचा पर्याय स्वीकारला. त्यातच २ चौकार आणि १ षटकार लगावून तो २९ धावांवर माघारी परतला. या दोघांनी मिळून ५५ धावांची भागीदारी केली. धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यात भागीदारी होत असतानाच जाडेजा धावचीत झाला आणि चेन्नईला सहावा धक्का बसला. जाडेजाने ११ धावा केल्या. एकीकडे फलंदाज बाद होताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक बाजू लावून धरली. ३५ चेंडूत त्याने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. निर्णायक क्षणी ब्राव्हो झेलबाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या.

त्याआधी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या फलंदाजांनी निराशा केली. मात्र पार्थिव पटेल आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी संयम राखत फटकेबाजी करुन संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला झटपट माघारी धाडण्यात चेन्नईचे गोलंदाज यशस्वी ठरले. दिपक चहरने कोहलीला माघारी धाडलं. यानंतर एबी डिव्हीलियर्स, अक्षदीप नाथ, स्टॉयनिस यांनी थोड्या-थोड्या कालावधीसाठी पार्थिव पटेलला चांगली साथ दिली. मात्र मोठी खेळी करण्यात ते अपयशी ठरले.

पार्थिव पटेलने मात्र एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं. त्याने ३७ चेंडूत ५३ धावा केल्या. ब्राव्होच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. पार्थिव बाद झाल्यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला १६१ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून दिपक चहर-शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. इम्रान ताहीरने एका फलंदाजाला बाद केलं.

Live Blog

23:44 (IST)21 Apr 2019
ब्राव्हो झेलबाद; चेन्नईला सातवा धक्का

ब्राव्हो झेलबाद; चेन्नईला सातवा धक्का

23:36 (IST)21 Apr 2019
कर्णधार धोनीचे धडाकेबाज अर्धशतक

एकीकडे फलंदाज बाद होताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक बाजू लावून धरली. ३५ चेंडूत त्याने धडाकेबाज अर्धशतक ठोकले.कर्णधार धोनीचे धडाकेबाज अर्धशतक

23:30 (IST)21 Apr 2019
रवींद्र जाडेजा धावचीत; चेन्नईला सहावा धक्का

धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्यात भागीदारी होत असतानाच जाडेजा धावचीत झाला आणि चेन्नईला सहावा धक्का बसला. जाडेजाने ११ धावा केल्या.

23:10 (IST)21 Apr 2019
अंबाती रायडू माघारी; चेन्नईला पाचवा धक्का

चार गडी झटपट बाद झाल्यानंतर अंबाती रायडूने धोनीच्या साथीने डाव सावरला, पण विजयासाठी आवश्यक असलेली धावगती गाठण्यासाठी त्याने फटकेबाजीचा पर्याय स्वीकारला. त्यातच २ चौकार आणि १ षटकार लगावून तो २९ धावांवर माघारी परतला.

22:29 (IST)21 Apr 2019
केदार जाधव झेलबाद; चेन्नईची अवस्था ४ बाद २८

डु प्लेसिस सारखाच फटका खेळून केदार जाधवही तंबूत परतला आणि चेन्नईला २८ या धावसंख्येवर चौथा धक्का बसला. केदारने ९ धावा केल्या.

22:19 (IST)21 Apr 2019
डु प्लेसिस झेलबाद; चेन्नईला तिसरा धक्का

सलामीवीर फाफ डु प्लेसिस मोठा फटका खेळण्यासाठी सरसावला, पण तो फटका चुकला आणि डु प्लेसिस ५ धावांवर माघारी परतला.

22:00 (IST)21 Apr 2019
वॉटसन माघारी; चेन्नईला पहिला धक्का

१६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली.आधी वॉटसन ५ धावांवर झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर स्टेनने रैनाचा (०) त्रिफळा उडवला.

21:45 (IST)21 Apr 2019
बंगळुरुची १६१ धावांपर्यंत मजल

चेन्नईला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी १६२ धावांचं आव्हान

21:45 (IST)21 Apr 2019
अखेरच्या षटकात मोईन अली माघारी, बंगळुरुला सातवा धक्का

ब्राव्होने घेतला बळी

21:35 (IST)21 Apr 2019
पवन नेगी माघारी, बंगळुरुला सहावा धक्का

दिपक चहरच्या गोलंदाजीवर अंबाती रायुडूने घेतला झेल

21:27 (IST)21 Apr 2019
स्टॉयनिस माघारी, बंगळुरुचा निम्मा संघ तंबूत परतला

ताहीरच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर बदली खेळाडू स्टेफनसनने घेतला स्टॉयनिसचा झेल

21:25 (IST)21 Apr 2019
पार्थिव पटेलचं अर्धशतक, बंगळुरुने ओलांडला १०० धावांचा टप्पा

इतर फलंदाज अपयशी ठरत असताना पार्थिव पटेलने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं आहे.

मात्र ब्राव्होच्या गोलंदीजावर तो लगेचच झेलबाद होऊन माघारी

21:06 (IST)21 Apr 2019
बंगळुरुला तिसरा धक्का, अक्षदीप नाथ माघारी

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर डु प्लेसिसने घेतला झेल

20:37 (IST)21 Apr 2019
एबी डिव्हीलियर्स माघारी, बंगळुरुला दुसरा धक्का

विराट माघारी परतल्यानंतर बंगळुरुची जमलेली जोडी फुटली

20:15 (IST)21 Apr 2019
विराट कोहली माघारी, बंगळुरुला पहिला धक्का

दिपक चहरच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनीने घेतला झेल

19:50 (IST)21 Apr 2019
चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

महेंद्रसिंह धोनीचं संघात पुनरागमन