News Flash

बुमराहने रोखला एबी डिव्हीलियर्सचा झंजावात, मुंबई इंडियन्स 6 धावांनी विजयी

बाराव्या हंगामात मुंबईचा पहिला विजय

बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर 6 धावांनी मात केली. बाराव्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय ठरला. एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र जसप्रीत बुमराहने 19 व्या षटकात भेदक मारा करत बंगळुरुचं आव्हान आणखी खडतर केलं. यानंतर अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या 18 धावा पूर्ण करत बंगळुरुला जमलं नाही. बुमराहने आजच्या सामन्यात 3 बळी घेतले.

लसिथ मलिंगाच्या अखेरच्या षटकात मुंबईच्या शिवम दुबेने षटकार खेचत रंगत निर्माण केली होती. मात्र मलिंगाने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. एबी डिव्हीलियर्सने 70 धावांची खेळी केली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी केली.

त्याआधी, युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी केलेला भेदक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर, बंगळुरुने घरच्या मैदानावर खेळत असताना मुंबई इंडियन्सला 187 धावांवर रोखलं.पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या मुंबई इंडियन्सने डावाची सुरुवात चांगली केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलने डी-कॉकचा त्रिफळा उडवत बंगळुरुला पहिला धक्का दिला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि युवराज सिंह यांनी फटकेबाजी करत रोहित शर्माला चांगली साथ दिली. यामुळे मुंबईने आश्वासक धावसंख्या गाठली.

मात्र मोक्याच्या क्षणी बंगळुरुच्या गोलंदाजांनी विकेट काढत मुंबईला बॅकफूटवर ढकललं. त्यातच मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, मिचेल मॅक्लेनघन हे फलंदाज आज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने मुंबईच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने 4 बळी घेतले. त्याला उमेश यादव आणि मोहम्मद सिराजने चांगली साथ दिली.

लोकसत्ता समालोचन
Live Blog
Highlights
  • 21:09 (IST)

    चहलच्या गोलंदाजीवर युवराजचा हल्लाबोल, मात्र चौथा षटकार खेचताना युवी माघारी

    चहलच्या गोलंदाजीवर लागोपाठ 3 षटकार खेचत युवराजने आपले इरादे स्पष्ट केले, मात्र चौथा षटकार खेचत असताना युवराज मोहम्मद सिराजच्या हाती झेल देत माघारी

  • 20:29 (IST)

    रोहित शर्मा - क्विंटन डी-कॉक जोडीची आश्वासक सुरुवात

    सलामीच्या जोडीसाठी दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी

23:57 (IST)28 Mar 2019
थरारक सामन्यात मुंबईचा 6 धावांनी विजय

लसिथ मलिंगाचा अखेरच्या षटकात भेदक मारा

23:57 (IST)28 Mar 2019
कॉलिन डी-ग्रँडहोम माघारी

बंगळुरुला पाचवा धक्का

23:28 (IST)28 Mar 2019
एबी डिव्हीलियर्सची झुंज सुरुच, झळकावलं अर्धशतक

एबी डिव्हीलियर्सने एका बाजूने लढा सुरु ठेवत आपलं अर्धशतक साजरं केलं. दरम्यान डिव्हीलियर्सने आयपीएलमध्ये 4 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला

23:27 (IST)28 Mar 2019
शेमरॉन हेटमायर माघारी, बंगळुरुला चौथा धक्का

बुमराहच्या गोलंदाजीवर पांड्याने घेतला झेल

23:10 (IST)28 Mar 2019
थोड्याच वेळात विराट माघारी, बुमराहने घेतली विकेट

टप्पा पडूस उसळी घेतलेल्या चेंडूवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात कोहली हार्दिक पांड्याकडे झेल देत माघारी.

विराटचं अर्धशतक 4 धावांनी हुकलं

23:09 (IST)28 Mar 2019
विराट कोहलीच्या आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर 46 वी धाव काढत विराटने हा अनोखा विक्रम केला आहे. 

अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरलाय

22:41 (IST)28 Mar 2019
पार्थिव पटेल त्रिफळाचीत, बंगळुरुला दुसरा धक्का

मयांक मार्कंडेच्या गोलंदाजीवर पार्थिव माघारी

22:23 (IST)28 Mar 2019
बंगळुरुला पहिला धक्का

मोईल अली चोरटी धाव घेताना धावबाद

21:57 (IST)28 Mar 2019
मुंबईची 187 धावांपर्यंत मजल

बंगळुरुला सामना जिंकण्यासाठी 188 धावांची गरज

21:56 (IST)28 Mar 2019
20 षटकात मुंबईची 188 धावांपर्यंत मजल

बंगळुरुला विजयासाठी 189 धावांचं आव्हान

21:45 (IST)28 Mar 2019
मयांक मार्कंडे माघारी

मुंबईचा आठवा गडी माघारी

21:32 (IST)28 Mar 2019
मिचेल मॅक्लेनघन माघारी, मुंबईला सातवा धक्का

मोहम्मद सिराजने उडवला मॅक्लेनघनचा त्रिफळा

21:29 (IST)28 Mar 2019
कृणाल पांड्या माघारी, मुंबईचा सहावा गडी माघारी

मोक्याच्या क्षणी बंगळुरुचं सामन्यात पुनरागमन

21:23 (IST)28 Mar 2019
त्याच षटकात कायरन पोलार्ड माघारी, मुंबईचा निम्मा संघ माघारी

चहलकडून मुंबईच्या डावाला खिंडार

21:20 (IST)28 Mar 2019
मुंबईला चौथा धक्का, सूर्यकुमार यादव माघारी

युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मोईन अलीने घेतला झेल

21:09 (IST)28 Mar 2019
चहलच्या गोलंदाजीवर युवराजचा हल्लाबोल, मात्र चौथा षटकार खेचताना युवी माघारी

चहलच्या गोलंदाजीवर लागोपाठ 3 षटकार खेचत युवराजने आपले इरादे स्पष्ट केले, मात्र चौथा षटकार खेचत असताना युवराज मोहम्मद सिराजच्या हाती झेल देत माघारी

20:58 (IST)28 Mar 2019
कर्णधार रोहित शर्मा माघारी, मुंबईला दुसरा धक्का

रोहितची धडाकेबाज खेळी, 33 चेंडूत 48 धावा

उमेश यादवच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने घेतला झेल

20:34 (IST)28 Mar 2019
मुंबईला पहिला धक्का, क्विंटन डी-कॉक माघारी

युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डी-कॉक त्रिफळाचीत होऊन माघारी

20:29 (IST)28 Mar 2019
रोहित शर्मा - क्विंटन डी-कॉक जोडीची आश्वासक सुरुवात

सलामीच्या जोडीसाठी दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी

19:48 (IST)28 Mar 2019
बंगळुरुने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

घरच्या मैदानावर विराटच्या खेळाकडे सर्व चाहत्यांचं लक्ष

मुंबईच्या संघात दोन बदल, मयांक मार्कंडे आणि लसिथ मलिंगाला संघात स्थान

टॅग : IPL 2019,Mi,Rcb
Next Stories
1 सोल्सजार झाले मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे नवे मॅनेजर
2 बायको आणि गर्लफ्रेंडची साथ पहिल्या सामन्यानंतर, विश्वचषकासाठी BCCI चा नवीन नियम
3 IPL 2019 : …बरं झालं RCB मधून बाहेर पडलो – लोकेश राहुल
Just Now!
X