News Flash

IPL चं नाणं विराटवर नाराज! जाणून घ्या आकडेवारी

बंगळुरूच्या संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी

IPL 2019 RCB vs RR : बंगळुरूच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना गुणतालिकेतील तळाच्या दोन संघांमध्ये असल्याने दोनही संघांना प्ले ऑफ्स फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने या सामन्यात विजय आवश्यक आहे. पण या दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने सामना सुरु होण्यास विलंब झाला.

विराट कोहलीच्या संघाला हा आणि यापुढचा दिल्लीविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. त्याबरोबरच त्यांना इतर सामन्यांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे. इतर सामन्यात बंगळुरूला हवे असल्याप्रमाणे निकाल लागले आणि बंगळुरूला नशिबाची साथ लाभली, तर अजूनही त्यांना प्ले ऑफ्स फेरी गाठता येऊ शकते. पण सध्याच्या कामगिरीवरून विराट आणि कंपनी यांना नशीब कितपत साथ देईल याबाबत शंकाच आहे.

याचे कारण विराट कोहलीच्या नशिबाने यंदाच्या IPL मध्ये त्याला नाणेफेकीत अतिशय कमी साथ दिली आहे. यंदाच्या IPL मध्ये बंगळुरूच्या संघाचा हा १३ वा सामना आहे. पण एकूण १३ सामन्यांपैकी १० सामन्यात विराटला नाणेफेक जिंकता आलेली नाही. मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद या ३ संघांविरुद्ध विराटने प्रत्येकी एकदा नाणेफेक जिकली. पण इतर संघाविरुद्ध त्याला नाणेफेक जिकता आली नाही.

दरम्यान, सध्या बंगळुरूच्या संघ गुणतालिकेत शेवटच्या म्हणजेच आठव्या स्थानी आहे. विराट कोहलीच्या संघाला पुढचे दोन सामने जिंकणे क्रमप्राप्त आहे. त्यातही विशेष म्हणजे राजस्थानविरूद्ध आणि दिल्लीविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा विजय आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला बाद फेरी गाठायची असेल तर त्यांना इतर उर्वरित सामन्यांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 8:59 pm

Web Title: ipl 2019 rcb vs rr virat kohli lost 10 out of 13 toss in ipl
टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 RCB vs RR : पावसाने काढली बंगळुरूची ‘विकेट’; सामना अनिर्णित
2 IPL 2019 : दिल्लीच्या खेळाडूंचा मला अभिमान – गांगुली
3 Video : भुवीने भन्नाट झेल घेत थांबवला पूरनचा झंजावात
Just Now!
X