IPL 2019 RCB vs SRH Live Updates : IPL २०१९ मध्ये सर्वात जास्त पराभव पाहिलेल्या बंगळुरूने हंगामाचा अखेर विजयाने केला. शिमरॉन हेटमायर (७५) आणि गुरकीरत सिंग (६५) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर बंगळुरूने हैदराबादला ४ गडी आणि ४ चेंडू राखून पराभूत केले. या पराभवामुळे हैदराबादची प्ले ऑफ्स फेरीत पोहोचण्याची वाट बिकट झाली असून त्यांना रविवारच्या २ सामन्यांच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात अतिशय खराब झाली. पार्थिव पटेल शून्यावर माघारी परतला. विराट कोहलीने धडाकेबाज सुरुवात केली होती, पण खलील अहमदने उत्तम चेंडू टाकून त्याला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. कोहलीने २ चौकार आणि १ षटकार लगावला. कोहली पाठोपाठ डिव्हिलियर्सदेखील लगेचच झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव केली. विंडीजचा तडाखेबंद फलंदाज शिमरॉन हेटमायर याला अखेरच्या साखळी सामन्यात सूर गवसला. ३ बाद २० या धावसंख्येवरुन डाव पुढे नेताना हेटमायरने पहिले IPL अर्धशतक ठोकले. गुरकीरत सिंगने संयमी खेळी करत अप्रतिम अर्धशतक ठोकले. याचबरोबर त्याने शिमरॉन हेटमायरसोबत शतकी भागीदारीही केली. पण अंतिम टप्प्यात फटकेबाजी करताना हेटमायर ७५ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ गुरकिरतही ६५ धावांवर बाद झाला. पण अखेर शेवटच्या षटकात २ चौकार खेचत उमेश यादवने बंगळुरूला विजय मिळवून दिला.

त्याआधी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या धावगतीवर चांगलाच अंकुश लावला. वृद्धीमान साहा (२०) आणि मार्टीन गप्टील (३०) जोडीने पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र साहा माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मात्र चौथ्या विकेटसाठी केन विल्यमसन आणि विजय शंकर यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. शंकर (२७) माघारी परतल्यानंतर हैदराबादच्या डावाला पुन्हा गळती लागली. एकीकडे फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्याने नाबाद ७० धावा केल्या.

बंगळुरुकडून वॉशिंग्टन सुंदरने ३, नवदीप सैनीने २ तर युजवेंद्र चहल आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

Highlights

  • 22:50 (IST)

    २ उत्तुंग षटकार; हेटमायरने ठोकले पहिले IPL अर्धशतक

    विंडीजचा तडाखेबंद फलंदाज शिमरॉन हेटमायर याला अखेरच्या साखळी सामन्यात सूर गवसला. ३ बाद २० या धावसंख्येवरुन डाव पुढे नेताना हेटमायरने पहिले IPL अर्धशतक ठोकले.

  • 20:53 (IST)

    वॉशिंग्टन सुंदरचे हैदराबादला दोन धक्के

    ठराविक अंतराने मार्टीन गप्टील आणि मनिष पांडे माघारी

    हैदाराबादचे ३ गडी बाद

23:57 (IST)04 May 2019
बंगळुरूची विजयी सांगता; हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान खडतर

बंगळुरूने हैदराबादला ४ गडी आणि ४ चेंडू राखून पराभूत केले. या पराभवामुळे हैदराबादची प्ले ऑफ्स फेरीत पोहोचण्याची वाट बिकट झाली असून त्यांना उद्याच्या २ सामन्यांच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.

23:34 (IST)04 May 2019
बंगळुरूच्या डावाला गळती; सामना रंगतदार स्थितीत

बंगळुरूच्या डावाला गळती; सामना रंगतदार स्थितीत

23:26 (IST)04 May 2019
हेटमायर ७५ धावांवर माघारी; सामन्यात रंगत

शतकी भागीदारी केल्यानंतर बंगळुरूच्या विजय दृष्टीपथात आला असे वाटत असतानाच हैदराबादने झटपट बळी टिपून संघात पुनरागमन केले. आधी हेटमायर मोठा फटका खेळताना बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ७५ धावा केल्या. पाठोपाठ गुरकीरतदेखील ६५ धावांवर बाद झाला.

23:16 (IST)04 May 2019
गुरकीरतचे अर्धशतक; हेटमायरसोबत शतकी भागीदारी

गुरकीरत सिंगने संयमी खेळी करत अप्रतिम अर्धशतक ठोकले. याचबरोबर त्याने शिमरॉन हेटमायरसोबत शतकी भागीदारीही केली.

22:50 (IST)04 May 2019
२ उत्तुंग षटकार; हेटमायरने ठोकले पहिले IPL अर्धशतक

विंडीजचा तडाखेबंद फलंदाज शिमरॉन हेटमायर याला अखेरच्या साखळी सामन्यात सूर गवसला. ३ बाद २० या धावसंख्येवरुन डाव पुढे नेताना हेटमायरने पहिले IPL अर्धशतक ठोकले.

22:20 (IST)04 May 2019
डीव्हिलियर्स झेलबाद; बंगळुरूचे ३ गडी माघारी

कोहली पाठोपाठ डिव्हिलियर्सदेखील लगेचच झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव केली. त्यामुळे बंगळुरूची अवस्था ३ बाद २० अशी झाली होती.

22:08 (IST)04 May 2019
कर्णधार कोहली बाद; बंगळुरुला दुसरा धक्का

विराट कोहलीने धडाकेबाज सुरुवात केली होती, पण खलील अहमदने उत्तम चेंडू टाकून त्याला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. कोहलीने २ चौकार आणि १ षटकार लगावला.

22:00 (IST)04 May 2019
बंगळुरुला पहिला धक्का, पार्थिव पटेल माघारी

१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात अतिशय खराब झाली. पार्थिव पटेल शून्यावर माघारी परतला.

21:45 (IST)04 May 2019
उमेश यादवच्या अखेरच्या षटकात विल्यमसनची फटकेबाजी

हैदराबादची १७५ धावांपर्यंत मजल

बंगळुरुला विजयासाठी १७६ धावांचं आव्हान

21:27 (IST)04 May 2019
हैदराबादचा सातवा गडी माघारी, राशिद खान बाद

कुलवंत खेजरोलियाने घेतला बळी

21:25 (IST)04 May 2019
मोहम्मद नबी माघारी, हैदराबादला सहावा धक्का

नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर गुरकिरत मान सिंहने घेतला झेल

21:18 (IST)04 May 2019
हैदराबादचा निम्मा संघ माघारी, युसूफ पठाण बाद

युजवेंद्र चहलने घेतला बळी

21:11 (IST)04 May 2019
विजय शंकर माघारी, हैदराबादला चौथा धक्का

वॉशिंग्टन सुंदरने घेतला बळी

20:53 (IST)04 May 2019
वॉशिंग्टन सुंदरचे हैदराबादला दोन धक्के

ठराविक अंतराने मार्टीन गप्टील आणि मनिष पांडे माघारी

हैदाराबादचे ३ गडी बाद

20:23 (IST)04 May 2019
हैदराबादला पहिला धक्का, वृद्धीमान साहा माघारी

नवदीप सैनीने घेतला बळी

19:44 (IST)04 May 2019
बंगळुरुने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

बाद फेरीसाठी हैदराबादला आजच्या सामन्यात विजय आवश्यक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 rcb vs srh live updates
First published on: 04-05-2019 at 19:39 IST