IPL 2019 RR vs DC Updates : ऋषभ पंतची (७८) दणकेबाज नाबाद खेळी आणि शिखर धवनचे (५४) अर्धशतक यांच्या बळावर दिल्लीने राजस्थानला ६ गडी राखून पराभूत केले. सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या नाबाद १०५ धावा आणि कर्णधार स्मिथचे दमदार अर्धशतक याच्या जोरावर राजस्थानने २० षटकात ६ बाद १९१ धावा ठोकल्या आणि दिल्लीला १९२ धावांचे आव्हान दिले होते. पण पंतच्या फटकेबाजीने दिल्लीला ४ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने चांगली सुरुवात करत सहाव्या षटकात अर्धशतकी सलामी दिली. चांगल्या लयीत असलेल्या शिखर धवनने देखील दमदार अर्धशतक ठोकले. पण त्यानंतर लगेचच तो माघारी परतला. त्याने २७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरदेखील स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ ४ धावा केल्या. शिखर धवन तुफानी खेळी करून बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने जबाबदारीने खेळ करत २६ चेंडूत अर्धशतक ठोकले. अत्यंत संयमी खेळी करणारा पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि दिल्लीला तिसरा धक्का बसला. शॉ ने ३९ चेंडूत ४२ धावा केल्या. अखेर ऋषभ पंतने नाबाद ७८ धावांची खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

त्याआधी दिल्लीचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि राजस्थानला प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले. अजिंक्य रहाणे याने धावेसाठी नकार दिला असतानाही सलामीवीर संजू सॅमसन धाव घेण्यासाठी पुढे आला. त्यामुळे रबाडाने त्याला धावबाद केले. सॅमसनला एकही चेंडू न खेळता माघारी परतावे लागले. संजू सॅमसन सुरुवातीलाच माघारी परतल्यानंतर कर्णधार स्मिथच्या साथीने अजिंक्य रहाणेने डाव सावरला. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थानने सहाव्या षटकात पन्नाशी गाठली. अतिशय संयमी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने या सामन्यात मात्र तडाखेबाज सुरुवात केली. पॉवर-प्ले मधील फटकेबाजीच्या जोरावर त्याने केवळ ३२ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले.

राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने ३१ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकले. पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला आणि दिल्लीला अखेर दिलासा मिळाला. रहाणे – स्मिथ जोडीने शतकी (१३०) भागीदारी केली. यात स्मिथने ८ चौकार लगावले. पाठोपाठ अष्टपैलू बेन स्टोक्स स्वस्तात झेलबाद झाला आणि राजस्थानला तिसरा धक्का बसला. त्याने ८ धावा केल्या. पण सलामीवीर अजिंक्य रहाणेने एक बाजू लावून धरत तुफान फटकेबाजी केली. त्याने ५८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. रहाणेने शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच टर्नर झेलबाद झाला. त्याने पहिल्या चेंडूवर झेल दिला. स्टुअर्ट बिन्नीही लवकर बाद झाला. त्याने १९ धावा केल्या. पण राहणे शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ६३ चेंडूत १०५ धावा केल्या. यात ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

Live Blog

Highlights

  • 23:52 (IST)

    पंतची दणकेबाज खेळी; दिल्लीची राजस्थानवर मात

    ऋषभ पंतची (७८) दणकेबाज नाबाद खेळी आणि शिखर धवनचे (५४) अर्धशतक यांच्या बळावर दिल्लीने राजस्थानला ६ गडी राखून पराभूत केले. 

  • 21:22 (IST)

    रहाणेचे तुफानी शतक

    सलामीवीर अजिंक्य रहाणेने एक बाजू लावून धरत तुफान फटकेबाजी केली. त्याने ५८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

  • 20:35 (IST)

    अजिंक्य रहाणेचे तडाखेबाज अर्धशतक

    अतिशय संयमी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने या सामन्यात मात्र तडाखेबाज सुरुवात केली. पॉवर-प्ले मधील फटकेबाजीच्या जोरावर त्याने केवळ ३२ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले.

  • 19:49 (IST)

    नाणेफेक जिंकून दिल्लीची प्रथम गोलंदाजी

    दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

23:52 (IST)22 Apr 2019
पंतची दणकेबाज खेळी; दिल्लीची राजस्थानवर मात

ऋषभ पंतची (७८) दणकेबाज नाबाद खेळी आणि शिखर धवनचे (५४) अर्धशतक यांच्या बळावर दिल्लीने राजस्थानला ६ गडी राखून पराभूत केले. 

23:27 (IST)22 Apr 2019
रुदरफर्ड झेलबाद; दिल्लीला चौथा धक्का

रुदरफर्ड झेलबाद; दिल्लीला चौथा धक्का

23:18 (IST)22 Apr 2019
पृथ्वी शॉ झेलबाद; दिल्लीला तिसरा धक्का

अत्यंत संयमी खेळी करणारा पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि दिल्लीला तिसरा धक्का बसला. शॉ ने ३९ चेंडूत ४२ धावा केल्या.

23:13 (IST)22 Apr 2019
ऋषभ पंतचे २६ चेंडूत अर्धशतक

शिखर धवन तुफानी खेळी करून बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने जबाबदारीने खेळ करत २६ चेंडूत अर्धशतक ठोकले.

22:37 (IST)22 Apr 2019
कर्णधार श्रेयस अय्यर बाद; दिल्लीला पहिला धक्का

कर्णधार श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ ४ धावा केल्या.

22:32 (IST)22 Apr 2019
अर्धशतकानंतर धवन बाद; दिल्लीला पहिला धक्का

चांगल्या लयीत असलेल्या शिखर धवनने दमदार अर्धशतक ठोकले. पण त्यानंतर लगेचच तो माघारी परतला. त्याने २७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या.

22:23 (IST)22 Apr 2019
दिल्लीची चांगली सुरुवात; सहाव्या षटकात अर्धशतकी सलामी

१९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने चांगली सुरुवात करत सहाव्या षटकात अर्धशतकी सलामी दिली.

21:45 (IST)22 Apr 2019
रहाणेचे तडाखेबाज शतक; दिल्लीला १९२ धावांचे लक्ष्य

रहाणेचे तडाखेबाज शतक; दिल्लीला १९२ धावांचे लक्ष्य

21:25 (IST)22 Apr 2019
रहाणेचे तुफानी शतक; टर्नर झेलबाद

रहाणेने शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच टर्नर झेलबाद झाला. त्याने पहिल्या चेंडूवर झेल दिला. 

21:24 (IST)22 Apr 2019
रहाणेचे तुफानी शतक; टर्नर झेलबाद

रहाणेचे तुफानी शतक; टर्नर झेलबाद

21:22 (IST)22 Apr 2019
रहाणेचे तुफानी शतक

सलामीवीर अजिंक्य रहाणेने एक बाजू लावून धरत तुफान फटकेबाजी केली. त्याने ५८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

21:20 (IST)22 Apr 2019
स्टोक्स झेलबाद; राजस्थानला तिसरा धक्का

अष्टपैलू बेन स्टोक्स स्वस्तात झेलबाद झाला आणि राजस्थानला तिसरा धक्का बसला. त्याने ८ धावा केल्या. 

21:03 (IST)22 Apr 2019
अर्धशतकानंतर लगेचच कर्णधार स्मिथ बाद; दिल्लीला अखेर दिलासा

राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने ३१ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकले. पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला आणि दिल्लीला अखेर दिलासा मिळाला. रहाणे - स्मिथ जोडीने शतकी भागीदारी केली. यात स्मिथने ८ चौकार लगावले.

20:35 (IST)22 Apr 2019
अजिंक्य रहाणेचे तडाखेबाज अर्धशतक

अतिशय संयमी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने या सामन्यात मात्र तडाखेबाज सुरुवात केली. पॉवर-प्ले मधील फटकेबाजीच्या जोरावर त्याने केवळ ३२ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले.

20:30 (IST)22 Apr 2019
सुरुवातीच्या धक्क्यानंतर रहाणे-स्मिथने डाव सावरला

संजू सॅमसन सुरुवातीलाच माघारी परतल्यानंतर कर्णधार स्मिथच्या साथीने अजिंक्य रहाणेने डाव सावरला. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थानने सहाव्या षटकात पन्नाशी गाठली.

20:06 (IST)22 Apr 2019
संजू सॅमसन धावबाद; राजस्थानला पहिला धक्का

अजिंक्य रहाणे याने धावेसाठी नकार दिला असतानाही सलामीवीर संजू सॅमसन धाव घेण्यासाठी पुढे आला. त्यामुळे रबाडाने त्याला धावबाद केले. सॅमसनला एकही चेंडू न खेळता माघारी परतावे लागले.

19:49 (IST)22 Apr 2019
नाणेफेक जिंकून दिल्लीची प्रथम गोलंदाजी

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 rr vs dc rajasthan royals delhi capitals live updates at jaipur
First published on: 22-04-2019 at 19:48 IST