IPL 2019 RR vs SRH : राजस्थानच्या गोलंदाजांनी मधल्या फळीत केलेल्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर राजस्थानने घरच्या मैदानावर हैदराबादला १६० धावांवर रोखण्यात यश मिळवलं. हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. जॉनी बेअरस्टो हा हैदराबादचा विश्वासू सलामीवीर विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परतला. त्यामुळे विल्यमसनला सलामीला यावे लागले. डेव्हिड वॉर्नर – केन विल्यमसन यांनी पहिल्या विकेटसाठी २८ धावांची छोटेखानी भागीदारी केली. मात्र विल्यमसन मैदानावर फार काळ तग धरु शकला नाही.

विल्यमसन बाद झाल्यानंतर मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आश्वासक भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. जॉनी बेअरस्टो हा हैदराबादचा विश्वासू सलामीवीर विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परतला. त्याच्या अनुपस्थितीत या दोघांनी संघाला शतक गाठून दिले. संघाची धावसंख्या १ बाद १०३ असताना वॉर्नरचा स्टीव्ह स्मिथने अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर हैदराबादला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. डेव्हिड वॉर्नर माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजीचा सामना करु शकले नाहीत. राजस्थानने भेदक गोलंदाजी करत हैदराबादचे ४४ धावांत ७ बळी टिपले.

यातच दीपक हुडा याच्या झेलची खूप चर्चा झाली. जयदेव उनाडकट याने अत्यंत सुंदर झेल टिपला. वेगवान गोलंदाजासाठी स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपणे हे अवघड असते. पण हुडाने मारलेला चेंडू उनाडकटने हवेत उडी मारून झेलला आणि हुडाला तंबूचा रस्ता दाखवला.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, त्या ४४ धावांमध्ये मनीष पांडे, विजय शंकर, शाकीब अल हसन, दिपक हुडा, वृद्धीमान साहा आणि भुवनेश्वर कुमार हे सात गडी एका पाठोपाठ एक असे तंबूत परतले. विल्यमसन, मनीष पांडे, वॉर्नर आणि रशीद खान वगळता कोणालाही दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. अखेर तळातल्या फळीतल्या फलंदाजांनी हैदराबादला १६० धावांचं लक्ष्य गाठून दिलं. राजस्थानकडून थॉमस, वरुण अरॉन, श्रेयस गोपाळ आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.