27 October 2020

News Flash

IPL 2019 RR vs SRH : घरच्या मैदानावर राजस्थानचा शेवट गोड; हैदराबाद पराभूत

लिआम लिव्हिंगस्टोन (४४) आणि अजिंक्य रहाणे (३९) च्या भागीदारीने रचला विजयाचा पाया

IPL 2019 RR vs SRH : IPL च्या या हंगामातील घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणाऱ्या राजस्थानने शेवट गोड करत हैदराबादवर ७ गडी राखून विजय मिळवला. मनीष पांडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानला १६१ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने ५ चेंडू राखून सहज पूर्ण केले.

१६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि नवोदित लिआम लिव्हिंगस्टोन या सलामीवीरांनी राजस्थानला दमदार सुरूवात करून दिली आणि सहाव्या षटकात अर्धशतकी सलामी दिली. लिव्हिंगस्टोन चांगली फलंदाजी करत असताना रशीद खानने त्याचा अडसर दूर केला आणि राजस्थानला पहिला धक्का दिला. लिव्हिंगस्टोन याने २६ चेंडूत ४४ धावा ठोकल्या. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. रहाणेने ३९ धावांची उपयुक्त खेळी केली. राजस्थानचा कर्णधार मोठा फटका खेळताना बाद झाला. त्याने २२ धावा केल्या.

त्याआधी, राजस्थानच्या गोलंदाजांनी मधल्या फळीत केलेल्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर राजस्थानने घरच्या मैदानावर हैदराबादला १६० धावांवर रोखण्यात यश मिळवलं. हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. जॉनी बेअरस्टो हा हैदराबादचा विश्वासू सलामीवीर विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परतला. त्यामुळे विल्यमसनला सलामीला यावे लागले. डेव्हिड वॉर्नर – केन विल्यमसन यांनी पहिल्या विकेटसाठी २८ धावांची छोटेखानी भागीदारी केली. मात्र विल्यमसन मैदानावर फार काळ तग धरु शकला नाही.

विल्यमसन बाद झाल्यानंतर मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आश्वासक भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. या दोघांनी संघाला शतक गाठून दिले. संघाची धावसंख्या १ बाद १०३ असताना वॉर्नरचा स्टीव्ह स्मिथने अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर हैदराबादला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. डेव्हिड वॉर्नर माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजीचा सामना करु शकले नाहीत. हैदराबादने झटपट ७ बळी गमावले. मनीष पांडे, विजय शंकर, शाकीब अल हसन, दिपक हुडा, वृद्धीमान साहा आणि भुवनेश्वर कुमार हे सात गडी एका पाठोपाठ एक असे तंबूत परतले. विल्यमसन, मनीष पांडे, वॉर्नर आणि रशीद खान वगळता कोणालाही दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.

अखेर तळातल्या फळीतल्या फलंदाजांनी हैदराबादला १६० धावांचं लक्ष्य गाठून दिलं. राजस्थानकडून थॉमस, वरुण अरॉन, श्रेयस गोपाळ आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

 • 21:13 (IST)

  हैदराबादला तिसरा धक्का, मनिष पांडे माघारी

  श्रेयस गोपाळला मिळाला बळी

 • 20:57 (IST)

  हैदराबादला दुसरा धक्का, डेव्हिड वॉर्नर माघारी

  जमलेली जोडी फोडण्यात राजस्थानला यश

 • 20:57 (IST)

  मनिष पांडेचं अर्धशतक, हैदराबादचा डाव सावरला

  मनिष पांडे - डेव्हिड वॉर्नरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी

  हैदराबादचा डाव सावरला

 • 20:20 (IST)

  हैदराबादला पहिला धक्का, विल्यमसन माघारी

  श्रेयस गोपाळने उडवला विल्यमसनचा त्रिफळा

23:37 (IST)27 Apr 2019
घरच्या मैदानावर राजस्थानचा शेवट गोड; हैदराबाद पराभूत

घरच्या मैदानावर राजस्थानचा शेवट गोड; हैदराबाद पराभूत

23:19 (IST)27 Apr 2019
कर्णधार स्मिथ माघारी; राजस्थानला तिसरा धक्का

राजस्थानचा कर्णधार मोठा फटका खेळताना बाद झाला. त्याला २२ धावा केल्या.

22:48 (IST)27 Apr 2019
अजिंक्य रहाणे माघारी; राजस्थानला दुसरा धक्का

चांगली सुरुवात मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. रहाणेने ३९ धावांची उपयुक्त खेळी केली.

22:36 (IST)27 Apr 2019
लिव्हिंगस्टोन माघारी; राजस्थानला पहिला धक्का

लिव्हिंगस्टोन चांगली फलंदाजी करत असताना रशीद खानने त्याचा अडसर दूर केला आणि राजस्थानला पहिला धक्का दिला. लिव्हिंगस्टोन याने २६ चेंडूत ४४ धावा ठोकल्या.

22:19 (IST)27 Apr 2019
राजस्थानची दमदार सुरूवात; सहाव्या षटकात अर्धशतक

१६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि नवोदित लिआम लिव्हिंगस्टोन या सलामीवीरांनी राजस्थानला दमदार सुरूवात करून दिली आणि सहाव्या षटकात अर्धशतकी सलामी दिली.

21:43 (IST)27 Apr 2019
हैदराबादची १६० धावांपर्यंत मजल

राजस्थानला विजयासाठी १६१ धावांचं आव्हान

21:39 (IST)27 Apr 2019
हैदराबादला आठवा धक्का, भुवनेश्वर कुमार माघारी

वरुण अरॉनने घेतला बळी

21:31 (IST)27 Apr 2019
हैदराबादला सातवा धक्का, शाकीब अल हसन माघारी

जयदेव उनाडकटने घेतला बळी

21:28 (IST)27 Apr 2019
वृद्धीमान साहा माघारी, हैदराबादला सहावा धक्का

थॉमसने घेतला बळी

21:20 (IST)27 Apr 2019
दिपक हुडा भोपळाही न फोडत माघारी, हैदराबादला पाचवा धक्का

जयदेव उनाडकटने आपल्याच गोलंदाजीवर घेतला झेल

21:19 (IST)27 Apr 2019
विजय शंकर माघारी, हैदराबादला चौथा धक्का

वरुण अरॉनने घेतला बळी

21:13 (IST)27 Apr 2019
हैदराबादला तिसरा धक्का, मनिष पांडे माघारी

श्रेयस गोपाळला मिळाला बळी

20:57 (IST)27 Apr 2019
हैदराबादला दुसरा धक्का, डेव्हिड वॉर्नर माघारी

जमलेली जोडी फोडण्यात राजस्थानला यश

20:57 (IST)27 Apr 2019
मनिष पांडेचं अर्धशतक, हैदराबादचा डाव सावरला

मनिष पांडे - डेव्हिड वॉर्नरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी

हैदराबादचा डाव सावरला

20:20 (IST)27 Apr 2019
हैदराबादला पहिला धक्का, विल्यमसन माघारी

श्रेयस गोपाळने उडवला विल्यमसनचा त्रिफळा

19:40 (IST)27 Apr 2019
स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकली

राजस्थानचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

टॅग IPL 2019,Rr
Next Stories
1 बाप-मुलगा दोन्ही ठरले धोनीची शिकार, रियान पराग-धोनीमधलं हे अनोखं नातं माहिती आहे का?
2 IPL 2019 : मुंबईच्या ‘हिटमॅन’ने मोडला ‘कॅप्टन कूल’चा विक्रम
3 IPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मलिंगा ठरला कर्दनकाळ, अनोख्या विक्रमाची नोंद
Just Now!
X