25 September 2020

News Flash

IPL 2019 : राजस्थानची भेदक गोलंदाजी; हैदराबादने गमावले ४४ धावांत ७ बळी

संघाची धावसंख्या १ बाद १०३ असताना वॉर्नरचा स्टीव्ह स्मिथने अप्रतिम झेल टिपला आणि ...

IPL 2019 RR vs SRH : राजस्थानच्या गोलंदाजांनी मधल्या फळीत केलेल्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर राजस्थानने घरच्या मैदानावर हैदराबादला १६० धावांवर रोखण्यात यश मिळवलं. हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. जॉनी बेअरस्टो हा हैदराबादचा विश्वासू सलामीवीर विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परतला. त्यामुळे विल्यमसनला सलामीला यावे लागले. डेव्हिड वॉर्नर – केन विल्यमसन यांनी पहिल्या विकेटसाठी २८ धावांची छोटेखानी भागीदारी केली. मात्र विल्यमसन मैदानावर फार काळ तग धरु शकला नाही.

विल्यमसन बाद झाल्यानंतर मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आश्वासक भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. जॉनी बेअरस्टो हा हैदराबादचा विश्वासू सलामीवीर विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परतला. त्याच्या अनुपस्थितीत या दोघांनी संघाला शतक गाठून दिले. संघाची धावसंख्या १ बाद १०३ असताना वॉर्नरचा स्टीव्ह स्मिथने अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर हैदराबादला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. डेव्हिड वॉर्नर माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजीचा सामना करु शकले नाहीत. हैदराबादने झटपट ७ बळी गमावले. मनीष पांडे, विजय शंकर, शाकीब अल हसन, दिपक हुडा, वृद्धीमान साहा आणि भुवनेश्वर कुमार हे सात गडी एका पाठोपाठ एक असे तंबूत परतले. विल्यमसन, मनीष पांडे, वॉर्नर आणि रशीद खान वगळता कोणालाही दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.

अखेर तळातल्या फळीतल्या फलंदाजांनी हैदराबादला १६० धावांचं लक्ष्य गाठून दिलं. राजस्थानकडून थॉमस, वरुण अरॉन, श्रेयस गोपाळ आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 11:10 pm

Web Title: ipl 2019 rr vs srh rajasthan bowlers did well to take hyderabad last 7 wickets in just 44 runs
टॅग IPL 2019
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहासाची नोंद, ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक पुरुषांच्या सामन्यात पंच
2 IPL 2019 RR vs SRH : घरच्या मैदानावर राजस्थानचा शेवट गोड; हैदराबाद पराभूत
3 बाप-मुलगा दोन्ही ठरले धोनीची शिकार, रियान पराग-धोनीमधलं हे अनोखं नातं माहिती आहे का?
Just Now!
X