किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात शनिवारी प्रथम फलंदाजी करताना १६३ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल याने दिल्लीच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. त्याने दणकेबाज खेळी करत ३७ चेंडूत ६९ धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने अर्धशतकी खेळी केली. अर्धशतक केल्यानंतर मात्र मैदानावर जे घडले, त्याची सर्वत्र चर्चा रंगली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अश्विन आणि बटलर यांच्यातील मंकड रन आऊट प्रकरण प्रचंड गाजले. त्यामुळे अश्विनवर टीकादेखील झाली. त्यामुळे शिखर धवन नॉन स्ट्राईकवर असताना अश्विनने त्याला मंकडींगची हूल दिली. पण धवनची बॅट क्रीजच्या आतमध्ये होती, त्यामुळे त्या मंकडींगच्या हूल देण्याला फारसे महत्व मिळाले नाही, पण त्यानंतरच्या चेंडूवर शिखर धवनने अश्विन चेंडू टाकत असताना क्रीजच्या आतमध्ये उभा राहून त्याला डान्स करून चिडवण्याचा प्रकार केला.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत असताना ख्रिस गेलने एक बाजू लावून धरत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळालेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, डेव्हिड मिलर हे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर ख्रिस गेलने मनदीप सिंहच्या साथीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यादरम्यान ख्रिस गेलने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. ही जोडी फुटल्यानंतर पंजाबचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. यानंतर हरप्रीत ब्रार आणि रविचंद्रन आश्विन यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. हा सामना जिंकण्यासाठी दिल्लीला १६४ धावांचं आव्हान आहे. पंजाबकडून संदीप लामिच्छानेने ३, अक्षर पटेल आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी २-२ बळी घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 shikhar dhawan gives dancing reply to r ashwin mankading warning
First published on: 20-04-2019 at 23:33 IST