IPL 2019 ही स्पर्धा २३ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या ग्रुप स्टेजचे म्हणजेच साखळी सामन्यांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, कोलकाता यासारख्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी सामने होणार नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र वेळापत्रकानुसार प्रत्येक संघाचे दरवर्षीप्रमाणे निम्मे सामने स्वतःच्या घरच्या मैदानात आणि निम्मे सामने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर होणार आहेत. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर संघाला मोठा झटका बसला आहे.

यंदाच्या लिलाव प्रक्रियेत कोलकाता संघाने खरेदी केलेला एक खेळाडू दुखापतीमुळे IPL 2019 ला मुकणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्ये याला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

एन्रिच नॉर्ये

 

त्याच्या खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. लिलाव प्रक्रियेत त्याची मूळ किंमत २० लाख रुपये इतकी होती. याच मूळ किमतीला त्याला विकत घेतले गेले. कोलकाता संघाकडे असलेले शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी या दोघांनी आधीच IPL 2019 मधून माघार घेतली होती. त्यात आता कोलकाता संघाचा तिसरा वेगवान गोलंदाज दुखापतीचा फटका बसल्याने स्पर्धेबाहेर झाला आहे.

वाचा साखळी फेरीचे संपूर्ण  वेळापत्रक –
२३ मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू, चेन्नई
२४ मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
२५ मार्च : राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, जयपूर
२६ मार्च : दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
२७ मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता
२८ मार्च : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
२९ मार्च : सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स, हैदराबाद
३० मार्च : किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स, मोहाली
दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली
३१ मार्च : सनराइझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, हैदराबाद
चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई
१ एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स, मोहाली
२ एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चैलेंजर्स बंगळुरू, जयपूर
३ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
४ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. सनराइझर्स हैदराबाद, दिल्ली
५ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
६ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई
सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद
७ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, जयपूर
८ एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनराइझर्स हैदराबाद, मोहाली
९ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, चेन्नई
१० एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई
११ एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर
१२ एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता
१३ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मोहाली
१४ एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
सनराइझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद
१५ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
१६ एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स, मोहाली
१७ एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद
१८ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
१९ एप्रिल : कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता
२० एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, जयपूर
दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली
२१ एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट राइडर्स, हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
२२ एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, जयपूर
२३ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद, चेन्नई
२४ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब, बंगळुरू
२५ एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता
२६ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
२७ एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. सनराइझर्स हैदराबाद, जयपूर
२८ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली
कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता
२९ एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब, हैदराबाद
३० एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
१ मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
२ मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई
३ मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट राइडर्स, मोहाली
४ मे : दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनराइझर्स हैदराबाद, बंगळुरू
५ मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स, मोहाली
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई