News Flash

IPL 2019 SRH vs DC : दिल्लीचा विजयी चौकार; हैदराबादवर ३९ धावांनी मात

रबाडाने सर्वाधिक ४ बळी टिपत मिळवली 'पर्पल कॅप'

IPL 2019 SRH vs DC Updates : हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने यजमानांना ३९ धावांनी पराभूत केले आणि सलग चौथा सामना जिंकला. कॉलिन मुनरो (४०) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (४५) यांच्या फटकेबाजीच्या बळावर दिल्लीने हैदराबादला सामना जिंकण्यासाठी १५६ धावांचे आव्हान दिले होते. मात्र कागिसो रबाडा, ख्रिस मॉरिस आणि किमो पॉल या वेगवान माऱ्यापुढे हैदराबादचा संघ ११६ धावांत गारद झाला. रबाडाने सर्वाधिक ४ बळी टिपत ‘पर्पल कॅप’ मिळवली.

१५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात करून दिली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी मिळून आठव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर बेअरस्टो झेलबाद झाला आणि हैदराबादला पहिला झटका बसला. त्याने ४१ धावा केल्या. दीर्घ विश्रांतीनंतर संघात आलेला कर्णधार विल्यमसनदेखील लवकर माघारी परतला. त्याने केवळ ३ धावा केल्या. नवख्या रिकी भुईलाही चांगली कामगिरी करता आली नाही. १२ चेंडूत ७ धावा करून तो बाद झाला. डेव्हिड वॉर्नरने एक बाजू लावून धरत अर्धशतक केले. पण फटकेबाजी गरजेची असल्याने त्या प्रयत्नात तो अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. तो बाद झाल्यावर हैदराबादच्या अडचणीत वाढ झाली. पत्त्याचा बंगला कोसळावा तसा हैदराबादचा डाव कोसळला. वॉर्नरनंतरच्या चेंडूवर विजय शंकरही १ धाव काढून बाद झाला. त्यामुळे हैदराबादचा डाव ११६ धावांमध्ये आटोपला.

नाणेफेक जिंकून कर्णधार केन विल्यमसनने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय त्याच्या सहकाऱ्यांनी सार्थ ठरवला. हैदराबादकडून खलिल अहमदने सर्वाधिक ३ बळी घेतले. दिल्लीच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ (४) खलिल अहमदच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतला. यानंतर शिखर धवनही (७) मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेल देऊन बाद झाला. यानंतर कॉलिन मुनरो (४०) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (४५) जोडीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. मात्र कॉलिन मुनरो माघारी परतल्यानंतर दिल्लीचा डाव परत कोलमडला. ऋषभ पंतने काही काळ फटकेबाजी केली, त्या जोरावर दिल्लीला १५५ धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे महत्वाच्या षटकांमध्ये दिल्लीचा संघ धावा जमवू शकला नाही. अखेरीस शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत दिल्लीने १५५ धावांपर्यंत मजल मारली.

लोकसत्ता समालोचन
Live Blog
Highlights
  • 23:41 (IST)

    दिल्लीचा विजयी चौकार; हैदराबादवर ३९ धावांनी मात

    हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने यजमानांना ३९ धावांनी पराभूत केले आणि सलग चौथा सामना जिंकला.

  • 20:04 (IST)

    नाणेफेक जिंकून हैदराबादची प्रथम गोलंदाजी

    केन विल्यमसनचं पुनरागमन

23:41 (IST)14 Apr 2019
दिल्लीचा विजयी चौकार; हैदराबादवर ३९ धावांनी मात

हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने यजमानांना ३९ धावांनी पराभूत केले आणि सलग चौथा सामना जिंकला.

23:31 (IST)14 Apr 2019
झटपट गडी माघारी; हैदराबाद पराभवाच्या छायेत

पत्त्याचा बंगला कोसळावा तसा हैदराबादचा डाव कोसळला. त्यामुळे हैदराबादच्या अडचणीत वाढ झाली.

23:25 (IST)14 Apr 2019
वॉर्नर बाद; हैदराबादच्या अडचणीत वाढ

डेव्हिड वॉर्नरने एक बाजू लावून धरत अर्धशतक केले. पण फटकेबाजी गरजेची असल्याने त्या प्रयत्नात तो अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. वॉर्नरनंतरच्या चेंडूवर विजय शंकरही १ धाव काढून बाद झाला.

23:16 (IST)14 Apr 2019
रिकी भुई बाद; हैदराबादला तिसरा धक्का

नवख्या रिकी भुईलाही चांगली कामगिरी करता आली नाही. १२ चेंडूत ७ धावा करून तो बाद झाला. 

22:58 (IST)14 Apr 2019
कर्णधार विल्यमसन माघारी; हैदराबादला दुसरा धक्का

दीर्घ विश्रांतीनंतर संघात आलेला कर्णधार विल्यमसनदेखील लवकर माघारी परतला. त्याने केवळ ३ धावा केल्या.

22:48 (IST)14 Apr 2019
बेअरस्टो झेलबाद; हैदराबादला पहिला झटका

बेअरस्टो झेलबाद झाला आणि हैदराबादला पहिला झटका बसला. त्याने ४१ धावा केल्या.

22:39 (IST)14 Apr 2019
हैदराबादची सावध सुरुवात, दिली अर्धशतकी सलामी

१५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात करून दिली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी मिळून आठव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले.

21:40 (IST)14 Apr 2019
दिल्लीचा सातवा गडी माघारी

भुवनेश्वर कुमारने घेतला बळी, दिल्लीने ओलांडला १५० धावांचा टप्पा

21:31 (IST)14 Apr 2019
ख्रिस मॉरिस त्रिफळाचीत, दिल्लीचा सहावा गडी तंबूत परतला

राशिद खानला सामन्यात पहिलं यश

21:22 (IST)14 Apr 2019
ऋषभ पंतही माघारी परतला, दिल्लीला पाचवा धक्का

खलिल अहमदला सामन्यात तिसरा बळी

21:20 (IST)14 Apr 2019
दिल्लीचा चौथा धक्का, श्रेयस अय्यर माघारी

भुवनेश्वर कुमारने घेतला बळी

20:44 (IST)14 Apr 2019
दिल्लीचा तिसरा गडी माघारी, कॉलिन मुनरो बाद

अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर बेअरस्टोने घेतला बळी

20:20 (IST)14 Apr 2019
दिल्लीला दुसरा धक्का, शिखर धवन माघारी

खलिल अहमदच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर भुवनेश्वर कुमारने घेतला झेल

20:10 (IST)14 Apr 2019
दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ माघारी

खलिल अहमदच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक बेअरस्टोने घेतला झेल

20:04 (IST)14 Apr 2019
नाणेफेक जिंकून हैदराबादची प्रथम गोलंदाजी

केन विल्यमसनचं पुनरागमन

टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : इम्रान ताहीरची गाडी सुस्साट, दिग्गज फिरकीपटूंना टाकलं मागे
2 Video : डु प्लेसिसने घेतलेला हा अफलातून झेल पाहिलात का?
3 Video : ‘हा विजय तुमच्यासाठीच!’; कोहली, डीव्हिलियर्सचा चाहत्यांना भावनिक संदेश
Just Now!
X