IPL 2019 SRH vs MI Updates – सलग ३ सामने जिंकलेल्या हैदराबादचा अश्वमेध मुंबईने त्यांच्याच मैदानावर रोखला. १३७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव केवळ ९६ धावांत आटोपला. मुंबईने सामना ४० धावांनी जिंकला आणि आपली विजयी लय कायम राखली. आपला पहिला IPL सामना खेळणारा अल्झारी जोसेफ याने ६ बळी टिपत मुंबईला कठीण वाटणारा विजय मिळवून दिला.

१३७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना धोकादायक सलामीवीर जॉनी बेअरस्टो लवकर माघारी परतला आणि हैदराबादला पहिला धक्का बसला. त्याने १० चेंडूत ३ चौकारांसह १६ धावा केल्या. चांगल्या लयीत असलेला डेव्हिड वॉर्नरदेखील पाठोपाठ त्रिफळाचीत झाला. अल्झारी जोसेफने IPL मधील आपल्या पहिल्याच षटकात हैदराबादला दुसरा धक्का दिला. वॉर्नरने १३ चेंडूत १५ धावा केल्या. विजय लगेच बाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या. आपला पहिला IPL सामना खेळणाऱ्या जोसेफने त्याला माघारी धाडत निर्धाव षटक टाकले. त्यानंतर मनीष पांडे आणि युसूफ पठाण एका पाठोपाठ झेलबाद झाले आणि हैदराबादचा निम्मा संघ गारद झाला. मनीषने १६ धावा केल्या, तर पठाण शून्यावर माघारी परतला. काही वेळात दीपक हुडा आणि रशीद खानदेखील सलग बाद झाले. दीपक हुडाने काही काळ संघर्ष करत २० धावा केल्या. पण त्याचा हैदराबादला फार उपयोग झाला नाही. रशीद खान पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर नबीने झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्याची झुंज मोडून काढण्यात आली. त्याने ११ धावा केल्या. पाठोपाठ भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल यांना माघारी पाठवत जोसेफने मुंबईला सामना जिंकवून दिला. त्याने १२ धावा देत ६ बळी टिपले.

त्याआधी हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमार याने पहिल्याच षटकात टाकलेला चेंडू रोहित शर्माच्या पायावर आदळला. पंचानी रोहितला नाबाद ठरवूनही हैदराबादने DRS चा पर्याय स्वीकारला. पण रिव्ह्यूमध्ये देखील तो नाबाद असल्याचे दिसून आले आणि हैदराबादला एकमेव रिव्ह्यूदेखील गमावावा लागला. पहिल्या षटकात नाबाद ठरवण्यात आलेला रोहित शर्मा अखेर चौथ्या षटकात माघारी परतला. मोहम्मद नबीच्या फिरकीचा समाचार घेण्याचा प्रयत्न करताना सीमारेषेवर तो झेलबाद झाला. रोहितने ११ धावा केल्या. मागील सामन्यात अर्धशतक ठोकणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. संदीप शर्माने त्याला ७ धावांवर बाद केले. चांगली सुरुवात मिळालेला सलामीवीर क्विंटन डी कॉक मोठा फटका खेळताना माघारी परतला आणि नवव्या षटकात मुंबईला तिसरा धक्का बसला. डी कॉकने १८ चेंडूत १९ धावा केल्या. IPL मध्ये आतापर्यंत उत्तम कामगिरी करणाऱ्या कृणाल पांड्याला या सामन्यात फारसा प्रभाव पाडता आला नाही. १३ चेंडूत ६ धावा करून तो तंबूत परतला. युवराजच्या जागी संघात स्थान मिळालेला ईशान किशन धावबाद झाला. किशनने २१ चेंडूत १७ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हार्दिक पांड्या या सामन्यात अपयशी ठरला. रशीद खानच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला आणि मुंबईचा सहावा गडी माघारी परतला, हार्दिकने १४ चेंडूत १४ धावा केल्या. फिरकीपटू राहुल चहर झटपट बाद झाला. मात्र त्याने २ चौकार लगावत १० धावा केल्या. फिरकीपटू राहुल चहर झटपट बाद झाला. मात्र त्याने २ चौकार लगावत १० धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात कायरन पोलार्डने फटकेबाजी केली. त्याने ४ षटकार आणि २ चौकार खेचत २६ चेंडूत नाबाद ४६ धावा ठोकल्या.

Live Blog

23:31 (IST)06 Apr 2019
जोसेफचा भेदक मारा; मुंबईने रोखला हैदराबादचा अश्वमेध

जोसेफचा भेदक मारा; मुंबईने रोखला हैदराबादचा अश्वमेध

23:18 (IST)06 Apr 2019
मोहम्मद नबी बाद; हैदराबादला आठवा धक्का

मोहम्मद नबी बाद; हैदराबादला आठवा धक्का

23:11 (IST)06 Apr 2019
हुडा, रशीद खान माघारी; हैदराबादचे ७ गडी बाद

दीपक हुडा आणि रशीद खानदेखील सलग बाद झाले. दीपक हुडाने काही काळ संघर्ष करत २० धावा केल्या. पण त्याचा हैदराबादला फार उपयोग झाला नाही. रशीद खान पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला.

22:46 (IST)06 Apr 2019
मनीष पांडे, युसूफ पठाण झेलबाद; हैदराबादचा निम्मा संघ गारद

मनीष पांडे आणि युसूफ पठाण एका पाठोपाठ झेलबाद झाले आणि हैदराबादचा निम्मा संघ गारद झाला. मनीषने १६ धावा केल्या, तर पठाण शून्यावर माघारी परतला.

22:30 (IST)06 Apr 2019
विजय शंकर झेलबाद; हैदराबादला तिसरा धक्का

विजय लगेच बाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या. आपला पहिला IPL सामना खेळणाऱ्या जोसेफने त्याला माघारी धाडत निर्धाव षटक टाकले.

22:19 (IST)06 Apr 2019
वॉर्नर त्रिफळाचीत; हैदराबादला दुसरा धक्का

चांगल्या लयीत असलेला डेव्हिड वॉर्नरदेखील पाठोपाठ त्रिफळाचीत झाला. अल्झारी जोसेफने IPL मधील आपल्या पहिल्याच षटकात हैदराबादला दुसरा धक्का दिला. वॉर्नरने १३ चेंडूत १५ धावा केल्या.

22:14 (IST)06 Apr 2019
धोकादायक बेअरस्टो माघारी; हैदराबादला पहिला धक्का

१३७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना धोकादायक सलामीवीर जॉनी बेअरस्टो लवकर माघारी परतला आणि हैदराबादला पहिला धक्का बसला. त्याने १० चेंडूत ३ चौकारांसह १६ धावा केल्या.

21:43 (IST)06 Apr 2019
शेवटच्या टप्प्यात पोलार्डची फटकेबाजी; हैदराबादपुढे १३७ धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना शेवटच्या टप्प्यात पोलार्डने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २० षटकात ७ बाद १३६ धावा केल्या आणि हैदराबादपुढे १३७ धावांचे लक्ष्य ठेवले. पोलार्डने ४ षटकार आणि २ चौकार खेचत २६ चेंडूत नाबाद ४६ धावा ठोकल्या.

21:33 (IST)06 Apr 2019
राहुल चहर बाद; मुंबईला सातवा धक्का

फिरकीपटू राहुल चहर झटपट बाद झाला. मात्र त्याने २ चौकार लगावत १० धावा केल्या.

21:27 (IST)06 Apr 2019
हार्दिक पांड्या झेलबाद; मुंबईचा सहावा गडी माघारी

शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हार्दिक पांड्या या सामन्यात अपयशी ठरला. रशीद खानच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला आणि मुंबईचा सहावा गडी माघारी परतला, हार्दिकने १४ चेंडूत १४ धावा केल्या.

21:06 (IST)06 Apr 2019
किशन धावबाद; मुंबईचा निम्मा संघ तंबूत

युवराजच्या जागी संघात स्थान मिळालेला ईशान किशन धावबाद झाला. किशनने २१ चेंडूत १७ धावा केल्या.

20:58 (IST)06 Apr 2019
कृणाल पांड्या माघारी; मुंबईला चौथा धक्का

IPL मध्ये आतापर्यंत उत्तम कामगिरी करणाऱ्या कृणाल पांड्याला या सामन्यात फारसा प्रभाव पाडता आला नाही. १३ चेंडूत ६ धावा करून तो तंबूत परतला.

20:41 (IST)06 Apr 2019
सलामीवीर डी कॉक माघारी; मुंबईला तिसरा धक्का

चांगली सुरुवात मिळालेला सलामीवीर क्विंटन डी कॉक मोठा फटका खेळताना माघारी परतला आणि नवव्या षटकात मुंबईला तिसरा धक्का बसला. डी कॉकने १८ चेंडूत १९ धावा केल्या.

20:28 (IST)06 Apr 2019
सूर्यकुमार यादव पायचीत; मुंबईला दुसरा धक्का

मागील सामन्यात अर्धशतक ठोकणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. संदीप शर्माने त्याला ७ धावांवर बाद केले.

20:23 (IST)06 Apr 2019
रोहित शर्मा माघारी; मुंबईला पहिला धक्का

पहिल्या षटकात नाबाद ठरवण्यात आलेला रोहित शर्मा अखेर चौथ्या षटकात माघारी परतला. मोहम्मद नबीच्या फिरकीचा समाचार घेण्याचा प्रयत्न करताना सीमारेषेवर तो झेलबाद झाला. रोहितने ११ धावा केल्या.

20:04 (IST)06 Apr 2019
रोहित नाबाद; हैदराबादने रिव्ह्यू गमावला

हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमार याने पहिल्याच षटकात टाकलेला चेंडू रोहित शर्माच्या पायावर आदळला. पंचानी रोहितला नाबाद ठरवूनही हैदराबादने DRS चा पर्याय स्वीकारला. पण रिव्ह्यूमध्ये देखील तो नाबाद असल्याचे दिसून आले आणि हैदराबादला एकमेव रिव्ह्यूदेखील गमावावा लागला.

20:01 (IST)06 Apr 2019
मुंबईच्या संघात २ बदल; युवराज, मलिंगा संघाबाहेर

मुंबईच्या संघात मात्र २ बदल करण्यात आले आहेत. युवराज सिंगला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जगही इशान किशन याला संधी मिळाली आहे. गेल्या IPL मध्ये इशानने चांगली कामगिरी केली होती. याशिवाय, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा मायदेशी परतला असल्याने त्याच्या जागी अल्झारी जोसेफला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.

19:43 (IST)06 Apr 2019
नाणेफेक जिंकून हैदराबादची प्रथम गोलंदाजी

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबादच्या संघात एकही बदल करण्यात आलेला नाही.