News Flash

IPL 2019 : IPL भारतातच; या तारखेपासून रंगणार थरार

BCCIच्या CoAची दिल्लीमध्ये बैठक

IPL 2019 : भारतात एप्रिल-मे दरम्यान लोकसभा निवडणुका होणार असल्या तरी IPL चे सर्व सामने हे भारतातच होणार आहेत. आज BCCIच्या प्रशासकीय समिती (CoA) ची दिल्लीमध्ये बैठक झाली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली. २३ मार्चपासून हा स्पर्धेचा थरार रंगणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासकीय समितीच्या सदस्यांची आज नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीदरम्यान IPL सामन्यांची ठिकाणे आणि वेळापत्रक याबाबत चर्चा झाली. या बैठकीतील प्राथमिक चर्चेनंतर विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार IPL स्पर्धा ही भारतातच खेळवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासह या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबतही चर्चा करण्यात आली असून २३ मार्च २०१९ पासून या स्पर्धेचा थरार रंगणार असल्याचे समजत आहे. या संदर्भात CoA इतर समभागधारकांशी चर्चा करणार असून त्यानंतर याबाबत तपशीलवार माहिती देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 5:02 pm

Web Title: ipl 2019 to be played in india despite general elections
Next Stories
1 नवीन वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाची दिवाळी, मालिका विजयासाठी BCCI कडून बोनस जाहीर
2 NZ vs SL : रॉस टेलरचे धमाकेदार शतक; मोडला विराट, सचिनचा विक्रम
3 आमच्या संघात कोणीही देव नाही, विराटचं कौतुक करताना शास्त्रींचा सचिनला अप्रत्यक्ष टोला
Just Now!
X