News Flash

Video : रसेलने मारलेला फटका थेट ब्रेथवेटला लागला आणि…

Video : रसेलच्या अंगावर आलेला चेंडू त्याने जोर काढून टोलवला

IPL 2019 KKR vs DC : कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १७८ धावा केल्या. शुभमन गिलचे अर्धशतक (६५) आणि आंद्रे रसलची फटकेबाजी (४५) यांच्या जोरावर कोलकाताने दिल्लीपुढे १७९ धावांचे आव्हान दिले.

कोलकाताकडून सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळालेला जो डेण्टली पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. इशांत शर्माने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी करत त्याला माघारी धाडले. किमो पॉल याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या ‘फ्री हिट’वर षटकार लगावत कोलकाताने अर्धशतकी मजल मारली. रॉबिन उथप्पाने अचूक फटका खेळत ‘फ्री हिट’चा उपयोग केला. धडाकेबाज सुरुवात मिळालेला रॉबिन उथप्पा उसळत्या चेंडूवर फटका लगावताना झेलबाद झाला. यष्टिरक्षकाने उंच उडी मारून त्याचा अप्रतिम झेल टिपला. उथप्पाने ४ चौकार आणि १ षटकार लगावत ३० चेंडूत २८ धावा केल्या. शुभमन गिल याने अप्रतिम खेळी साकारत दमदार अर्धशतक झळकावले. पण कोलकाताच्या संघाला तो आनंद फार काळ साजरा करता आला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातच नितीश राणा त्रिफळाचीत झाला आणि कोलकाताचा तिसरा गडी माघारी परतला. राणाने १२ चेंडूत ११ धावा केल्या. अर्धशतक पूर्ण केल्यावर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल झेलबाद झाला आणि कोलकाताला चौथा धक्का बसला. गिलने ३९ चेंडूत दमदार ६५ धावा केल्या. यात ७ चौकार आणि २ षटकार समाविष्ट होते. कर्णधार दिनेश कार्तिक २ धावांवर बाद झाला आणि कोलकाताला पाचवा धक्का बसला.

त्यानंतर आंद्रे रसलने नेहमीप्रमाणे फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पण या फटकेबाजीत कोलकाताचा त्याचाच सहकारी क्रेग ब्रेथवेट जखमी होता होता वाचला. रसेलच्या अंगावर आलेला चेंडू त्याने जोर काढून टोलवला. पण तो थेट जाऊन नॉन स्ट्राईकवर असलेल्या कार्लोस ब्रेथवेटला लागला. ब्रेथवेट धिप्पाड असल्याने त्याला फारशी इजा झाली नाही. ही बाब समालोचकांनीही बोलून दाखवली. त्यांनतर ब्रेथवेटदेखील हसत हसत पुन्हा उभा राहिला आणि खेळ पुढे सुरु झाला.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, त्यानंतर रसलने तुफान फटकेबाजी केली. त्याने ३ चौकार आणि २ षटकार खेचत ४५ धावा केल्या. पण मॉरिसच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. पाठोपाठ क्रेग ब्रेथवेटही ६ धावांवर बाद झाला. शेवटच्या टप्प्यात पियुष चावलाच्या ६ चेंडूत १४ धावांच्या जोरावर कोलकाताने १७८ धावांपर्यंत मजल मारता आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 11:18 pm

Web Title: ipl 2019 video kkr vs dc russell almost hits ball to teammate carlos brathwaite
टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : भन्नाट स्विंग! इशांतने पहिल्याच चेंडूवर उडवला फलंदाजाचा त्रिफळा, पहा Video
2 IPL 2019 KKR vs DC : दिल्लीचा ‘गब्बर’ विजय; कोलकातावर ७ गडी राखून मात
3 IPL 2019 : ” …म्हणून धोनीने मैदानावर जाऊन घातला राडा ” ; CSK कडून स्पष्टीकरण
Just Now!
X