IPL 2019 RR vs KXIP : राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या २ संघांमध्ये आजचा सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ख्रिस गेलच्या ७९ धावा आणि सर्फराज अहमदची नाबाद ४६ धावांची खेळी याच्या जोरावर पंजाबने २० षटकात ४ बाद १८४ धावा केल्या आणि राजस्थानपुढे विजयासाठी १८५ धावांचे आव्हान ठेवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलर याने शानदार अर्धशतक केले. पण तो ४३ चेंडूत ६९ धावांवर असताना त्याला अजब पद्धतीने बाद करण्यात आले. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने अर्धशतकवीर जोस बटलरला अजब पद्धतीने धावबाद केले. गोलंदाजीत चेंडू टाकण्याआधी त्याने नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांच्या वरील बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. त्यामुळे पंचानी त्याला बाद ठरवले.

 

 

दरम्यान, पंजाबच्या डावात टीम इंडियाकडून फारसा प्रभावी न ठरलेल्या लोकेश राहुलची IPL ची सुरुवातदेखील वाईट झाली. धवल कुलकर्णीने त्याचा बळी टिपत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. राहुलने केवळ ४ धावा केल्या. या दरम्यान पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल याने एक नवा इतिहास रचला. त्याने आपल्या डावात ६ धावा करत IPL मध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा सर्वात जलद पार करण्याचा मान गेलला मिळाला. पण ख्रिस गेल मैदानात असूनही पंजाबची सुरुवात संथ झाली. पंजाबने ८ षटकात अर्धशतक पूर्ण केले. गेल संयमी खेळ करत असल्याने मयंक अग्रवालने फटकेबाजीची जबाबदारी स्वतःवर घेतली. पण त्याला फार मोठी खेळी करता आली नाही. तो २४ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार लगावून २२ धावांवर बाद झाला. त्यानंतर २९ चेंडूत ३४ धावांची संयमी खेळी करणाऱ्या गेलने जयदेव उनाडकटला चोपून काढले. सलग ३ चौकार आणि त्यानंतर षटकार अशी फटकेबाजी करत गेलने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पण झंझावाती खेळ करणारा ख्रिस गेल ७९ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठी याने सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल टिपला. ४७ चेंडूच्या खेळीत गेलने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले. बेन स्टोक्सने त्याला माघारी धाडले. पाठोपाठ निकोलस पूरण १२ धावा काढून बाद झाला. पण सर्फराजने २९ चेंडूत धमाकेदार नाबाद ४६ धावांची खेळी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 video rr vs kxip r ashwin jos buttler run out
First published on: 25-03-2019 at 23:29 IST