आयपीएलच्या बाराव्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाच्या पराभवाची मालिका रविवारच्या सामन्यातही सुरुच राहिली. दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरुवर ४ गडी राखून मात केली. या सामन्यात बंगळुरुला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरीही कर्णधार विराट कोहलीने आपल्या ४१ धावांच्या खेळीत एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. कोहली सुरेश रैनानंतर आयपीएलमध्ये एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरोधात ८०० धावांचा टप्पा ओलांडणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

आयपीएलमध्ये एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरोधात ८०० धावांचा टप्पा ओलांडणारे फलंदाज –

कोहलीने आपल्या ४१ धावांच्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला. दरम्यान दिल्लीविरुद्धच्या सामन्यात बंगळुरुच्या डावाची सुरुवात खराब झाली. पार्थिव पटेल झटपट माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर तळ ठोकत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. एबी डिव्हीलियर्स, मार्कस स्टॉयनिस ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मोईन अलीच्या साथीने विराट कोहलीने फटकेबाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. मात्र कगिसो रबाडाने एकाच षटकात ३ फलंदाजांना माघारी धाडत बंगळुरुला पुन्हा धक्का दिला. अखेरीस बंगळुरुला १४९ धावांपर्यंत मजल मारला आली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ४, ख्रिस मॉरिसने २ बळी घेतले. त्यांना अक्षर पटेल आणि संदीप लामिच्छानेने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.