X

IPL 2019 : नव्या हंगामासाठी विराट कोहली सज्ज !

चिन्नास्वामी मैदानावर केला कसून सराव

गेलं वर्षभर भारतीय संघाचं यशस्वीपणे नेतृत्व केलेला कर्णधार विराट कोहली आता आयपीएलच्या नवीन हंगामासाठी सज्ज झाला आहे. २३ मार्चपासून आयपीएलच्या बाराव्या हंगामाला सुरुवात होते आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ समोरासमोर येणार आहेत. या सामन्यासाठी विराट कोहलीने सरावाला सुरुवात केली असून, चिन्नास्वामी मैदानावर सरावादरम्यानचे काही फोटो त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.‘चिन्नास्वामी’वर आल्याचा मला आनंद आहे, मैदानात उतरण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. अशा आशयाचा संदेश विराट कोहलीने इतर संघांना दिला आहे.

अवश्य वाचा – विराट कोहली कर्णधार म्हणून धोनीवर अवलंबून – अनिल कुंबळे

गेल्या काही हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कामगिरी चांगली झाली नाही. या संघाला एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाहीये. यंदा बंगळुरुच्या संघाने विंडीजचा शेमरॉन हेटमायर आणि ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस यांना आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कशी कामगिरी करतय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • Tags: IPL 2019, rcb, virat-kohli,